सिगारेटचा धूर तंबाखूचा विडा. शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. (smoke)लोकांच्या मनात असा प्रश्न नेहमी असतो की सिगारेट जास्त धोकादायक आहे की तंबाखूचा विडा. तज्ज्ञांचं म्हणणं लक्षात घेतलं तर दोन्हीही शरीराला घातकच आहेत. परंतु, दोन्हीही घटक वेगवेगळ्या पद्धतींनी शरीराचे नुकसान करतात. तंबाखू विविध रुपांत उपलब्ध आहे. आज जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्ताने तंबाखुमुळे शरीराचे कसे नुकसान होते याची माहिती घेऊ या..सिगारेट, बीडी, हुक्का यांसारखे धूम्रपानाची तंबाखू उत्पादनांतील धूर फुप्फुसांवर थेट परिणाम करतो. यामधील टार, निकोटिन आणि कार्बन मोनोऑक्साइड यांसारख्या विषारी घटकांमुळे फुप्फुसांचा कॅन्सर, हृदयविकार, स्ट्रोक, सीओपीडी अशा आजारांना आमंत्रण देतो. तंबाखुच्या धुरात सात हजारांपेक्षा जास्त रसायने असतात. यातील काही विषारी असतात. यातील जवळपास 70 रसायने कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात.
तंबाखूच्या धुराचा काय होता इफेक्ट
ऑन्कोलॉजिस्ट डॉ. पुनीत गुप्ता सांगतात तंबाखुच्या धुरातील टार फुप्फुसांच्या प्ल्युरांना इजा करतात. यामुळे शरीरातून अपायकारक पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत. (smoke)गुटखा, पानमसाला, खैनी यांसारखे तंबाखू उत्पादने तोंड, जीभ आणि गळ्याचा कॅन्सर निर्माण करू शकतात. यामधल नायट्रोसामाइन्स आणि पॉलीसाइक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स सारखे कॅन्सरकारी तत्व डीएनएला नुकसान करून पेशींमध्ये म्यूटेशन निर्माण करतात.सिगारेट, तंबाखू अन् कोल्ड ड्रिंक महागणार? ‘या’ दैनंदिन वस्तू स्वस्त होणार, 21 डिसेंबरला होणार निर्णय भारतात जवळपास 90 टक्के तोंडाचे कॅन्सर स्मोकलेस तंबाखूमुळे उद्भवतात. याशिवाय अन्ननलिका, गळा, पित्ताशयाचा कॅन्सरही स्मोकलेस तंबाखुमुळे होऊ शकतो. धूम्रपान फक्त जो सिगारेट ओढतोय त्यालाच नाही तर आसपासच्या लोकांनाही संकटात टाकतो. घरातील एखादा व्यक्ती धूम्रपान करत असेल तर त्याच्या घरातील अन्य सदस्यांना कॅन्सरचा धोका असतोच. गर्भवती महिलांत कॅन्सर, दमा, फुप्फुसांचे आजार वाढण्याची शक्यता असते.
स्मोकिंग करण्याचे धोके काय
फुप्फुसांचा कॅन्सर, क्रॉनिक ब्रोंकायटिस, एम्फायसेमा, हृदयविकार, घरातील व्यक्तींना कॅन्सरचा धोका, सिगारेट आणि बीडीचा धूर शरीराच्या सर्वच अवयवांनी इजा करतो.
स्मोकलेस तंबाखूचे धोके काय
तोंड, गळा, जीभ, अन्ननलिकेचा कॅन्सर होतो. (smoke)हिरड्यांचे आजार आणि दातांचे नुकसान होते. पांढरे डाग जे नंतर कॅन्सरमध्ये रुपांतरीत होऊ शकतात. निकोटिनची सवय लागते आणि रक्तदाबही वाढू शकतो.
दोघांत जास्त धोकादायक कोण
तज्ज्ञांचं म्हणणं लक्षात घेतलं तर दोन्ही समानरुपाने नुकसानकारक आहेत. फरक इतकाच आहे की स्मोकिंगचा परिणाम पूर्ण शरीरावर लवकर दिसून येतो. स्मोकलेस तंबाखू तोंड आणि घशापासून सुरू होऊन हळूहळू शरीराला नष्ट करते. तंबाखू मग ती कोणत्याही रुपात असो यामुळे हृदय, फुप्फुस आणि शरीराच्या पेशींवर परिणाम करते. त्यामुळे तंबाखूची सवय जितक्या लवकर सोडताल तितके फायद्याचे राहील.
हेही वाचा :
- दोघांच्या भांडणात तिसऱ्याची उडी! पवार कुटुंब एकत्र येण्यावरुन राऊत-राणे एकमेकांना भिडले
- मित्रांनीच केला मित्राचा घात; वाहत्या पाण्यात टाकले अन्…
- ऐन दिवाळीत राज्यात पुन्हा निवडणूक? निवडणुका दोन टप्प्यात होणार?