भाजपकडून ममताराज खालसा!……….केरळात आता काँग्रेस राज

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी

एकतंत्री कारभार, महिलाविषयक अनिश्चित धोरण, विकासात्मक कामापासून (rule) दूर, अल्पसंख्यांक समाजाचे दुष्टीकरण, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, हिंदू विरोधी भूमिका,या तृणमूल काँग्रेससाठी पीएमसी प्रतिकूल ठरलेल्या मुद्द्यांना अधोरेखित करून त्याच मुद्द्यांवर निवडणूक फिरवत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच आणि ती सुद्धा एक हाती सत्ता आणून ममता राज खालसा करून टाकले आहे. केरळमध्ये काँग्रेसने बाजी मारून तेथील कम्युनिस्ट राजवट उलथवून टाकले आहे तर तामिळनाडूच्या लोकशाहीच्या पडद्यावर विजयी थनपती या अभिनेत्याने प्रस्थापितांना बाजूला सारत दमदार एन्ट्री केली आहे. तर आसाम आणि पांडिचेरी येथील सुद्धा भाजप व मित्र पक्षांनी अबाधित ठेवली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे लागून राहिले होते. तेथे भाजपने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणुमल काँग्रेसची सलग पंधरा वर्षे सत्ता होती.

त्याच्याही आधी हे राज्य कितीतरी वर्षे कम्युनिस्ट पॉलिट ब्युरोच्या ताब्यात होते. (rule) पश्चिम बंगालमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे अतिशय कसोशीचे प्रयत्न सुरू होते. यंदाची निवडणूक जिंकायचीच या निर्धाराने भारतीय जनता पक्ष इथे उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनी पश्चिम बंगाल मध्ये प्रचाराचे रान उठवले होते. विशेषतः अमित शहा हे तब्बल 15 दिवस तेथे तळ ठोकून होते. सर्व प्रकारची सुरक्षा बाजूला सारून नरेंद्र मोदी यांनी एका दुकानात ग्राहक म्हणून जाऊन तेथे झालमोडी हा पदार्थ विकत घेतला. ही घटना संपूर्ण देशभर मोबाईलवर व्हायरल झाली होती. त्या भागात अर्थातच भाजपचा उमेदवार जिंकला. हा राजकीय स्टंट वगळला तर पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून मुद्द्यांची लढाई हाती घेतली गेली होती. ममता बॅनर्जी यांच्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत पश्चिम बंगालचा सर्वांगीण विकास झाला नाही.

रोजगार उपलब्ध करून दिले नाहीत, दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या (rule) कुटुंबांची संख्या प्रचंड प्रमाणावर पोहोचलेली,
पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत, या संदर्भात ममता बॅनर्जी यांनी”महिलांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी सायंकाळी सात नंतर घराबाहेर पडू नये”असा सल्ला दिला होता, यासह अनेक मुद्द्यांचे भाजपने या निवडणुकीत राजकीय भांडवल केले होते. पश्चिम बंगाल आमच्या हातात द्या आम्ही विकासाचा अनुशेष भरून काढू. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ.सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू, महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करू, बांगला देशांची घुसखोरी थांबवू, तुष्टीकरण केले जाणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन राज्यकारभार करू अशी आश्वासने भाजपने या निवडणुकीत दिली होती. ममता बॅनर्जी यांनी नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध केला होता. हा मुद्दा सुद्धा भाजपने अतिशय आक्रमकपणे प्रचारात आणला होता.

विकासापासून दूर गेलेला पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी यांचा एककल्ली, (rule)एकतंत्री कारभार हे दोन मुद्दे भाजपच्या स्टार प्रचारकांनी तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अतिशय प्रभावीपणे प्रचार सभा मधून मांडले होते. त्याचा मोठा फायदा भाजपला या निवडणुकीत झालेला दिसतो. याशिवाय भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष हे या देशातील नारीशक्तीला वंदन करतात.तिचा सन्मान करतात. तिला आर्थिक दृष्ट्या सबल बनवतात हा आश्वासक संदेश बंगालमधील सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यात भाजपाला यश मिळाले आणि म्हणूनच या महत्त्वाच्या राज्यात भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच सत्ता हस्तगत केली आहे.मोदी सरकारने पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दलाचे जवान तैनात केले होते. सर्वसामान्य मतदारांच्या मनात दहशत निर्माण केली होती. असा युक्तिवाद टीएमसी कडून केला जातोय, तसे असते तर मग भाजपच्या विरोधी मतदारांचा कल गेला असता.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 293 पैकी शंभर सुद्धा जागा जिंकता आलेल्या नाहीत. याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी त्यांना या निवडणुकीत सपशेल नाकारलेले आहे असा होतो.केरळमध्ये अनेक वर्षे कम्युनिस्ट सत्ता होती. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालेले दिसते. राहुल गांधी यांनी ही सत्ता हस्तगत केलेली आहे. देशातील हे एकमेव पण छोटेसे राज्य कम्युनिस्टांच्या हुकमतीखाली होते. तथापि त्यांना अगदी काठावर बहुमत होते. आता काँग्रेसने त्यांना काठावर बसवले आहे. तामिळनाडूमध्ये एके काळी अभिनेत्री जयललिता यांची सत्ता होती. त्यांच्या निधनानंतर या राज्यातील राजकीय चित्र बदलले. तिथे डी एम के ची सत्ता होती. आता तिथे पुन्हा तामिळ चित्रपटांमध्ये पडद्यावर दमदार एन्ट्री करणाऱ्या विजय थलपती त्याने तितकीच दमदार एन्ट्री केलेली आहे. त्यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा तिथे जिंकलेल्या आहेत. सध्या तिथे त्रिशंकू अवस्था दिसत असली तरी विजय थलपती यांचा टीव्हीके हा पक्ष काबीज करू शकतो.

तामिळनाडूमध्ये आपला पक्ष नवीन असला तरी विकास घडवून आणू शकतो, पायाभूत सुविधा अधिक मजबुतीने देऊ शकतो असा विश्वास तेथील मतदारांच्या मनात निर्माण केल्यामुळेच विजय थलपती यांना तेथील सर्वसामान्य मतदारांचे समर्थन मिळालेले दिसते.आसाम मध्ये सलग तिसऱ्यांदा भाजप सरकार आलेले आहे. तसेच पंडिचेरी या छोट्याशा राज्यात भाजप व मित्र पक्षांनी सत्ता काबीज केलेली आहे. एकूणच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये तीन ठिकाणी सत्तांतर झालेले आहे. भाजप आणि काँग्रेस यांनी चांगले यश मिळवलेले आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीचे प्रमुख असलेले राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्याबद्दल अतिशय टोकाची आणि प्रतिकूल मते व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला नाममात्र जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?