‘सैराट’ फेम ‘सल्या’ विवाहबंधनात; अरबाज शेखने गर्लफ्रेंड सिमरनशी केला निकाह

मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचणाऱ्या ‘सैराट’ सिनेमाला (married)नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. काही वर्षांपूर्वी या चित्रपटातील बाळ्याची भूमिका गाजवणारा तानाजी गळगुंडे विवाहबंधनात अडकून एका मुलाचा पिता झाला होता. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत परशाचा दुसरा जिवलग मित्र सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख यानेही खऱ्या आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.अरबाजने आपली अनेक वर्षांची मैत्रीण असलेल्या सिमरन हिच्यासोबत नुकताच आपला निकाह पार पाडला आहे. हे दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांसोबत नात्यात होते आणि अखेर त्यांनी या प्रेमाला अधिकृत नाव दिले. या आनंदाच्या बातमीची घोषणा स्वतः अभिनेत्याने आपल्या समाजमाध्यम खात्यावरून विवाह सोहळ्याचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर करत दिली आहे.

या विशेष दिवसासाठी या नवदाम्पत्याने अत्यंत साधा पण सर्वांचे लक्ष वेधून (married)घेणारा असा सुरेख पोशाख निवडला होता. अरबाजने या सोहळ्यासाठी क्रिम रंगाची आकर्षक शेरवानी परिधान केली होती, तर सिमरननेही त्याच रंगाची साडी नेसून त्यावर भरजरी दागिन्यांचा साज चढवला होता. इंटरनेटवर हे सुंदर क्षण पोस्ट करताना या अभिनेत्याने ‘जस्ट अस’ अशी खास आणि छोटी कॅप्शन दिली आहे.

नवविवाहित जोडप्याने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यामध्ये मुख्य अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने या पोस्टखाली हार्ट आणि फायर इमोजी कमेंट करत आपल्या सहकलाकाराला वैवाहिक जीवनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. इतर अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींनीही या दोघांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अरबाजने आपल्या अभिनयाची (married)चुणूक अनेक हिंदी आणि मराठी कलाकृतींमधून दाखवून दिली आहे. त्याने ‘झुंड’, ‘घर बंदूक बिरयाणी’ , ‘एकदम कडक’ आणि ‘यारी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या भूमिका उत्तमरीत्या साकारल्या. याव्यतिरिक्त, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मटका किंग’ या बहुचर्चित वेब सीरिजमध्येही त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?