महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने स्मशानात नेऊन कृत्य उघड

गेल्या काही दिवसांपासून (fraudster)राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. नाशिकमधील खरात प्रकरणानंतर राज्यभरातून भोंदू बाबांची अशीच अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता पालघरमध्येही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अघोरी पूजा करण्याच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय भोंदू बाबाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलीवर सध्या पालघरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघरच्या कासा पोलीस (fraudster)ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव थांबत नसल्याने, अघोरी पूजेद्वारे औषध देण्याच्या बहाण्याने रात्री बारा वाजेच्या सुमारास स्मशानभूमीजवळ नेऊन या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतीय न्याय (fraudster)संहिता २०२३चे कलम ६४(१),६५(१),३५१(२), सह पोस्को कलम ४(२),८,१२ प्रमाणे आरोपी भोंदूवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पालघर पोलीस करत आहेत. फिर्यादीची बहीण हिला मासिक पाळीचा त्रास होता. तिच्यावर गावरान उपचार करण्यासाठी आरोपी शिवराम परशु सावर याच्याकडे गेल्या होत्या. त्यानंतर ३ मे २०२६ रोजी आरोपी स्वतःची इको कार घेऊन आणि साक्षीदार सुरेश माहद्या सोमण याला सोबत घेऊन खताडपाडा येथे आला. तेथून त्याने फिर्यादी, पीडित मुलगी, तिचे काका यांना कारमध्ये बसवून ‘गावठी औषध देतो’ असे सांगत चरी पावण ता. डहाणू, जि. पालघर येथे आणले.

४ मे २०२६ रोजी मध्यरात्री (fraudster) १ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. तत्पूर्वी, रात्री ११:३० वाजता आरोपीने फिर्यादी, पीडित मुलगी आणि साक्षीदार यांना औषध आणण्याच्या बहाण्याने पुन्हा इको कारमध्ये बसवून थोड्या अंतरावर नेले. चरी पावण येथील रस्त्याच्या कडेला कार उभी करून त्याने साक्षीदाराला कारमध्येच थांबवले. पीडित मुलगी केवळ १३ वर्षांची असून ती अल्पवयीन आहे हे ठाऊक असतानाही, आरोपी शिवराम सावर याने तिच्या अज्ञानाचा फायदा घेतला. त्याने पीडितेला रस्त्यापासून दूर जंगलात नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. तसेच, ‘याबाबत कोणाला सांगितले तर मारून टाकीन’ अशी धमकीही त्याने पीडितेला दिली.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?