ठाकरेंच्या युवा सेनेला धक्का! अपघातात तडफदार नेता गमावला

उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या नव्या दमाच्या नेतृत्वापैकी एक (setback)असलेल्या युवा नेत्याचं अपघाती निधन झालं आहे. शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांच्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील समन्वयक असलेल्या श्वेतांक तांबेंचं अपघाती निधन झाल्याने पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. कायम हसतमुख चेहरा असलेला श्वेतांक तांबे हा त्याच्या मनमिळवू स्वभावासाठी ओळखला जायचा. गेल्याच आठवड्यात श्वेतांकने स्वत:चा 30 वा वाढदिवस साजरा केला होता. मात्र अपघातात त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. सोशल मीडियावर श्वेतांकला श्रद्धांजली वाहताना अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आदित्य ठाकरेंनाही श्वेतांकला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

श्वेतांकच्या निधनाने तरुण तडफदार कार्यकर्ता आणि सच्चा शिवसैनिक (setback) हरपल्याच्या भावना शिवसैनिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. युवासेना नेते जय सरपोतदार यांनी श्वेतांकबद्दल बोलताना, “श्वेतांकला श्रद्धांजली अर्पण करावी लागेल असं वाटलं नव्हतं कधी, एक निष्ठावंत शिवसैनिक आणि प्रामाणिक मित्र गेला,” अशा आंदरांजली वाहिली आहे. अनेक मित्रांनी तर परवापर्यंत श्वेतांक आपल्या संपर्कात होता असं म्हटलं आहे. परवा रात्री फेसबुक लाइव्ह करणारा मित्र आज आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

श्वेतांक इतका मनमिळावू होता की त्याचे इतर पक्षांमध्येही अनेक मित्र होते. (setback)म्हणूनच शिंदेंची शिवसेना, भाजपमधील नेते-कार्यकर्त्यांनीही त्याच्या निधानाच्या वृत्तानंतर शोक व्यक्त केला आहे. या वयात तुला श्रद्धांजली देण्याची वेळ माझ्यावर येईल कधीच वाटलं नव्हतं, लवकर गेलास मित्रा, अशा भावना अनेक युवा कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटसमधून व्यक्त केल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी शोक व्यक्त करताना, “तुझा हसरा चेहरा आणि मनमोकळा स्वभाव कायम आठवणीत राहील. तुझी उणीव कायम भासेल,” असं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनीही रात्री साडेबारा वाजता आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन पोस्ट करत श्वेतांकला श्रद्धांजली अर्पण केली आहे. “युवासेना वांद्रे पूर्व विधानसभा समन्वयक, निष्ठावंत शिवसैनिक श्वेतांक तांबे ह्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि तांबे कुटुंबियांना ह्या दुःखातून सावरण्याचे बळ देवो. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती,” अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली आहे. श्वेतांकच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. शशांकच्या आकस्मिक निधानाने कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?