ज्याच्या पहिल्या चित्रपटात हिरो बनला थलपती विजय, त्याच्याच पक्षाचा निवडणूकीत केला सफाया…

तामिळ चित्रपटसृष्टीतून राजकारणात उतरलेला थलपती विजय सध्या प्रचंड चर्चेत आहे.(hero) आपल्या दमदार एण्ट्रीसाठी ओळखला जाणारा विजय आता राजकीय मैदानातही तितक्याच आक्रमक शैलीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. तामिळनाडूच्या राजकारणात त्याच्या पक्षाने केलेली कामगिरी ही अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे. जनतेने एका अभिनेत्यावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याची चर्चा रंगली आहे.या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नेते एम. के. स्टॅलिन आणि त्यांचा पक्ष द्रविड मुनेत्र कळघम यांना मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे. मतमोजणीपासून निकालापर्यंत एकतर्फी वातावरण दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विजयच्या या यशामुळे चित्रपटसृष्टीतही आनंदाचे वातावरण आहे, कारण त्याची फॅन फॉलोइंग प्रचंड मोठी आहे.

विशेष म्हणजे विजय आणि स्टॅलिन यांच्यात केवळ राजकीयच नाही (hero) तर चित्रपटसृष्टीतीलही एक जुना संबंध आहे. स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याच्या प्रोडक्शन हाऊसने विजयसोबत काम केलं होतं. २००८ साली आलेल्या कुरुवी या चित्रपटाची निर्मिती रेड जायंट मुव्हीज या कंपनीने केली होती, जी उदयनिधी स्टॅलिन यांची आहे. या चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री त्रिशा आणि आशीष विद्यार्थी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

या चित्रपटाच्या निमित्ताने विजय आणि स्टॅलिन कुटुंब यांच्यातील संबंध अधिक घट्ट झाले होते. (hero) त्या काळात उदयनिधी यांनी विजयला आपल्या प्रोडक्शनचा पहिला मोठा हिरो म्हणून सादर केलं होतं. मात्र, काळ बदलला आणि परिस्थितीही बदलली. आज जिथे एकेकाळी एकत्र काम केलं होतं, तिथेच आता राजकीय पटलावर दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत.१८ वर्षांपूर्वी ज्या घराण्याने विजयला हिरो म्हणून सादर केलं, त्याच घराण्याविरुद्ध आज तो राजकीय लढाईत उतरल्याचं चित्र दिसत आहे. चित्रपटातून सुरू झालेली ही ओळख आता राजकारणात स्पर्धेत बदलली असून, तामिळनाडूच्या राजकारणात एक नवं समीकरण तयार होत असल्याची चर्चा जोर धरत आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?