लाच घेताना सांगली महापालिकेचे उपयुक्त वैभव साबळे रंगेहात अटकेत;

सांगली (प्रतिनिधी): सांगली महापालिकेतील(Municipal Corporation) एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. उपयुक्त वैभव साबळे यांनी २४ मजली इमारतीसाठी परवानगी देण्याच्या बदल्यात तब्बल ७ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केली असून, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता मुंबईहून आलेल्या विशेष पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

ही केस हाय प्रोफाईल असल्याने राज्यभरातून याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात माजी आयुक्त शुभम गुप्ता यांचं नावही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. IMS दर्जाचे अधिकारी असलेल्या गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

कारवाईची माहिती मिळताच सांगली महापालिकेच्या(Municipal Corporation) विभागीय कार्यालयासमोर बांधकाम व्यावसायिकांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे मुख्याधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर देखील साबळे यांच्या बदलीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

या घटनांवरून स्थानिक पातळीवरील नाराजी आणि प्रशासनावरील अविश्वास प्रकर्षाने जाणवतो. एकीकडे महापालिकेत कामासाठी सामान्य जनतेला खेटे घालावे लागतात, तर दुसरीकडे उच्चपदस्थ अधिकारी लाखोंच्या लाचांमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत.

या प्रकरणाचा सखोल तपास ACB करत असून, आणखी कोणकोण यामध्ये सहभागी आहेत, याचा शोध लावण्यासाठी तपास सुरू आहे.

हेही वाचा :