युद्ध इराणमध्ये, फटका भारताला पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार?

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले असून भारतात पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागण्याची भीती आहे. दर आठवड्याला होणाऱ्या संभाव्य दरवाढीबद्दल

पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे, (Petrol and Diesel) या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता भारतीय सर्वसामान्यांच्या खिशावर होत असल्याचे संकेत पाहायला मिळत आहेत. जगभरातील कच्च्या तेलाच्या जागतिक किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या प्रचंड वाढीमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ रुपयांपर्यंत वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्यामुळे भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाला दरमहा सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारताची अर्थव्यवस्था हे मोठे नुकसान दीर्घकाळ सोसू शकणार नाही. त्यामुळे येत्या आठवड्यापासूनच इंधन दरवाढीची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर लिटरमागे आठवड्याला २ ते ३ रुपये याप्रमाणे ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. सध्या पश्चिम आशियातील संकट पाहता पेट्रोलियम उत्पादनांचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे. आपण केवळ गरजेनुसारच इंधनाचा वापर केला पाहिजे. (Petrol and Diesel)यामुळे परकीय चलनाची बचत होईलच, पण युद्धाचे आर्थिक दुष्परिणाम कमी करण्यासही मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तज्ज्ञांचे आणि नेत्यांचे मत यावर पश्चिम बंगालचे नेते दिलीप घोष यांनी भाष्य केले. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जागतिक संघर्षामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था धोक्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी परिस्थिती संयमाने हाताळली असून आतापर्यंत किमती वाढू दिल्या नाहीत. मात्र, आता आपण संभाव्य बदलांसाठी तयार राहिले पाहिजे, असे दिलीप घोष म्हणाले.सद्यस्थितीत पेट्रोलियम कंपन्यांना दरमहा ५०,००० कोटींचा तोटा होत आहे. (Petrol and Diesel) त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरात एकूण २५ रुपयांपर्यंत वाढीची शक्यता वर्तवली जात आहे. साधारण दर आठवड्याला पेट्रोल आणि डिझेलची किंमत २ ते ३ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?