झाशी हादरली! हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुलाचे आढळले मृतदेह विषप्राशनाचा संशय

झाशीतील एका हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळले. युवराज यादव आणि भारती यांनी विषप्राशन केल्याचा संशय असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

झाशी जिल्ह्यात झालेल्या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. दोन कपल यांनी एक हॉटेल बुक केल होत. मात्र आतून दोघे बाहेर का येत नाहीत. हे पाहायला गेल्यावर दोघांचे ही मृतदेह आढळून आले आहेत. झाशीच्या होटल रॉयल इन यामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. (hotel) खोली नंबर २०५ मध्ये हे दोघे जण राहत होते. मृत तरुणाचे नाव हे युवराज यादव (२३) तर मृत महिलेच नाव हे भारती (वय ३४) वर्ष अशी या दोघांची नाव आहेत. मात्र या दोघांच्या मृत्यूच कारण ऐकून तुम्हाला पण धक्का बसेल.

युवराजच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कारण युवराज हा घरात हुशार मुलगा होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पुढे त्याला सरकारी नोकरीत काम करायचं होत म्हणून तो सतत झटत होता. मात्र त्या महिलेमुळ सतत घरी ये जा करत असायचा. हे दोघे नक्की कसे प्रेमात पडले याचा कुटुंबाला सुगावा नव्हता. (hotel) जेव्हा ही घटन घडली तेव्हा मात्र कुटुंबाला धक्काच बसला. युवराजच्या आठवणीत त्याचे वडील आणि काका व्याकुळ झाले आहेत. कारण युवराज चांगले शिकून नोकरीला लागल्यावर घर सांभाळेल असा विश्वास त्यांना होता मात्र अचानक ही घटना त्यांना पाहायला मिळाली.

होटल रॉयल इनमध्ये दोघांचा मृतदेह आढळून आल्यावर पोलीस तातडीने तिथे पोहोचले. पोलिसांनी आधी प्राथमिक माहिती गोळा केली आणि त्यानंतर या दोघांचा मृतदेह हा पोस्टमार्टेमसाठी त्यांनी पाठवून दिला. त्या दोघांनी विषप्राशन केली असावी असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी शासकीय रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आल होत. (hotel) मात्र त्यांना रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल आहे. दोघांनी सोबतच विष प्राशन केल्याने सगळ्यांना मात्र धक्का बसला आहे. नक्की यांचे प्रेम कसे जुळले? यांच्यात काही वाद होता का? दोघांनी आत्महत्या करण्याचं कारण काय आहे? याचा तपास हा पोलीस करत आहेत. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?