इचलकरंजी | प्रतिनिधी : आज पहाटे इचलकरंजीतील उत्तम-प्रकाश टॉकीज चौकात मोठा अपघात(accident) थोडक्यात टळला. वीज वितरणासाठी लावलेला एक मोठा लाईट खांब अचानकपणे रस्त्याच्या मधोमध कोसळला, मात्र सुदैवाने त्या वेळी रस्त्यावर कोणीही नव्हते, त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.
भारतीय जनता पार्टीचे प्रमोद बाळासाहेब बचाटे यांना मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही सतर्क नागरिकांनी तात्काळ फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले.

प्रमोद बचाटे यांनी MSEB (महाराष्ट्र राज्य वीज मंडळ) अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून वीजपुरवठा बंद करवून घेतला. त्यानंतर कोसळलेल्या खांबावरील सर्व CCTV आणि लाईट कनेक्शन सुरक्षितरीत्या डिस्कनेक्ट करण्यात आले.
यावेळी महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, हे विशेष नमूद करण्यासारखे आहे.
नागरिकांच्या मदतीने खांब रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आला, तरीही त्याचा काही भाग अजूनही रस्त्यावर आहे(accident). त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमोद बाळासाहेब बचाटे यांनी महापालिकेला नम्र विनंती केली आहे की, तात्काळ कारवाई करून हा खांब पूर्णतः हटवावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना करण्यात यावी.
हेही वाचा :
इचलकरंजीत बसवेश्वर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
महापालिका रणधुमाळीला प्रारंभ : सुरेश हाळवणकर यांच्याकडून भाजपच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू