सोनं-चांदीचे दर कडाडले, वाचा आजचे लेटेस्ट भाव

केंद्र सरकारने मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून आला आहे. दिल्ली आणि चेन्नईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये १४ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली. रुपयाच्या मूल्यात झालेली ऐतिहासिक घसरणही या महागाईला कारणीभूत ठरली असून, ग्राहकांना आता दागिन्यांच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

आयात शुल्कातील बदल आणि महानगरांमधील सोन्याचे नवे भाव बुधवार, १३ मे पासून सरकारने सोने आणि चांदीवरील आयात कर ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तर प्लॅटिनमवरील कर ६.४ टक्क्यांवरून १५.४ टक्के करण्यात आला आहे. याचबरोबर मौल्यवान धातूंची नाणी व लगडींवरील करातही बदल झाले आहेत. या निर्णयामुळे बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्यामध्ये ८,५५० रुपयांची म्हणजे ५ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम १,६५,३५० रुपयांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्ड ४,७००.८६ डॉलर प्रति औंस आहे.(Gold and silver) तसेच, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया बुधवारी ९५.८० या विक्रमी नीचांकी पातळीवर जाऊन नंतर ९५.६६ वर बंद झाला, ज्याचा मोठा फटकाही दरांना बसला.

१४ मे रोजी सकाळी दिल्लीत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव अनुक्रमे ₹१,६२,१६० आणि ₹१,४८,६६० प्रति १० ग्रॅम होते. मुंबई (Mumbai) तसेच कोलकाता (Kolkata) येथे २४ कॅरेटसाठी १६२०१० रुपये आणि २२ कॅरेटसाठी १४८५१० रुपये मोजावे लागत आहेत. पुणे (Pune) व बंगळूरु (Bengaluru) शहरांमध्येही मुंबईप्रमाणेच २४ कॅरेटचे दर १६२०१० रुपये व २२ कॅरेटचे दर १४८५१० रुपये नोंदवले गेले. चेन्नईमध्ये मात्र हेच भाव अनुक्रमे ₹१,६३,६८० आणि ₹१,५०,०१० प्रति १० ग्रॅम इतके वाढलेले पाहायला मिळाले.

सोन्याबरोबरच चांदीनेही ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे. १४ मे रोजी सकाळी एक किलो चांदीचा भाव ३,१०,१०० रुपयांवर पोहोचला होता. याआधीच्या दिवशी, म्हणजेच बुधवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीत तब्बल २०,५०० रुपयांची घसघशीत वाढ नोंदवली गेली आणि दर २,९७,५०० रुपये प्रति किलोवर गेले. (Gold and silver) चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात चांदीने देशात ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला होता हे विशेष. सध्या जागतिक बाजारात स्पॉट सिल्व्हरची किंमत ८७.४५ डॉलर प्रति औंस इतकी असून, देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींवर हे सर्व भाव अवलंबून आहेत.

या दरवाढीवर भाष्य करताना तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, आयात कर वाढल्यामुळे देशातील किमती आणखी वधारतील आणि प्रत्यक्ष खरेदीवर काही काळासाठी मंदी येईल. रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या निरीक्षणानुसार, कर वाढवल्याने देशातील आयात कमी होत नाही, (Gold and silver) तर केवळ भाव वाढतात. चालू खात्यातील तूट आटोक्यात आणण्यासाठी आयात शुल्क वाढवण्याऐवजी सोन्या-चांदीच्या आयातीचे प्रमाण मर्यादित करणे हा अधिक योग्य आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे मत अनेक सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा

सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत

देवेंद्र फडणवीस यांचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सर्वच मंत्री हालचाली वाढल्या!

रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?