बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका अपघातातून(accident) थोडक्यात बचावली आहे. तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान ही घटना घडली असून, प्रियांकाच्या चेहऱ्याजवळ गंभीर दुखापत झाली. मात्र सुदैवाने डोळ्याला इजा न झाल्यामुळे मोठा धोका टळला आहे.

प्रियांकाने स्वतः एका चॅट शोमध्ये या अपघाताचा(accident) अनुभव शेअर केला. ‘हेड्स ऑफ स्टेट’ या ॲक्शन-कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा प्रसंग घडला. जॉन सीना आणि इद्रिस एल्बासोबत ती ‘द टुनाइट शो starring जिमी फॉलन’ या लोकप्रिय अमेरिकन शोमध्ये सहभागी झाली होती. तिथेच तिने हा किस्सा उलगडला.
प्रियांका सांगते, “शॉटमध्ये मला पावसात जमिनीवर लोळत जावे लागणार होते. त्यावेळी कॅमेरा माझ्या अगदी जवळ आला आणि मीही थोडी पुढे गेले. कॅमेऱ्याच्या मॅट बॉक्सचा कोपरा माझ्या भुवईवर लागला आणि ती पूर्ण कापली गेली.” ती पुढे म्हणाली, “डोळ्याजवळ हा धक्का बसला असता, तर तो खूप धोकादायक ठरला असता.” प्रियांकाने आपल्या कृतज्ञतेचा उल्लेख करत सांगितले की, या अपघातानंतरही तिने शूटिंग पूर्ण केले कारण तिला पुन्हा पावसात शूटिंग करायचे नव्हते.
या अपघातानंतर(accident) प्रियांकाच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. मात्र अभिनेत्रीने ज्या शांततेने आणि व्यावसायिकतेने ही परिस्थिती हाताळली, ती तिच्या अनुभवाची आणि समजूतदारपणाची प्रचिती देणारी आहे.
प्रियांकाचा हा बहुप्रतिक्षित ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा ॲक्शन-कॉमेडी चित्रपट २ जुलै २०२५ रोजी Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत जॉन सीना आणि इद्रिस एल्बा हे प्रसिद्ध हॉलिवूड कलाकार दिसणार आहेत.
यासोबतच, प्रियांका भारतीय सिनेसृष्टीतही परतण्याच्या तयारीत आहे. लवकरच ती दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि महेश बाबू यांच्यासोबत SSMB29 या प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्याकडून आणखी काही मोठ्या प्रोजेक्ट्सची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
चहलच्या नावाने ट्रोल करणाऱ्याला RJ महवशचं सणसणीत उत्तर; म्हणाली, ‘मी तेव्हापासून क्रिकेट…’
Kolhapur News: भाजप नेत्याच्या घरावर EDची छापेमारी; 15 तास चौकशी
“२४ तासाची शॉर्ट नोटीस आणि माघारी गेलेलं पथक!” – श्रध्दा अकॅडमीच्या अतिक्रमण प्रकरणावरून नवा गोंधळ