वाशी नातेवाईकांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कोल्हापूरकडे निघालेल्या दुचाकीला पीरवाडी (ता. करवीर) येथे अज्ञात टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात योगिता दीपक दिंडे (50, रा. सडोली खालसा) यांचा मृत्यू झाला; (accident) तर त्यांचे पती दीपक दिनकर दिंडे (58) गंभीर जखमी झाल. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

दिंडे दाम्पत्य रविवारी सकाळी दुचाकीवरून कोल्हापूर येथे नातेवाईकांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी निघाले होते. पीरवाडी येथे टेम्पोने ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. परिसरातील नागरिकांनी जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. (accident) योगिता यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिंडे दाम्पत्याला दोन मुले असून एक मुलगा इंजिनिअर आहे, तर दुसरा मुलगा सहा महिन्यांपूर्वी सैन्य दलात भरती झाला आहे.
हेही वाचा
जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात
ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?