पुण्यात भररस्त्यात हत्या अनैतिक संबंधांच्या संशयातून 41 वर्षीय व्यक्तीचा खून

पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून 41 वर्षीय रुपेश भादिर्गे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. आरोपी युवराज गेजगे हल्ल्यानंतर फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अनैतिक संबंधांच्या संशयातून व्यक्तीची भररस्त्यात हत्या मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार आरोपी फरार; पोलिसांकडून शोध आणि तपास सुरू पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाचे संशयातून एका 41 वर्षीय व्यक्तीचा भर रस्त्यात धारदार शस्त्रने हल्ला करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेत मृत्यू झालेल्या रुपेश सुरेश भादिर्गे असे आहे. युवराज गेजगे असे आहे. आरोपीच्या पत्नीचे आणि रुपेश चे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याच कारणावरून आरोपीच्या मनात रुपेश बद्दल तीव्र राग होता. याच रागातून रविवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी आणि रुपेशमध्ये जोरदार वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. (relationship) याच वादातून युवराज ने जवळ असलेल्या तीक्ष्ण दर्जा हत्याराने रूपेशवर सपासप वार केले. मानेवर डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने रुपेश हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हे वार एवढे गंभीर होते की रुपेशचा मृत्यू घटनास्थळी झाला. हल्ल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्यावरून मुलीनेच आपल्या वडीलांचा चाकूने छातीत वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून, मुलीकडूनच वडिलांचा खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय ७०, रा. काशिवाडी) असे खुन झालेल्यांचे नाव आहे. (relationship) याप्रकरणी खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय ४०, रा. पोलीस चौकीच्या समोर, काशिवाडी) हिला अटक केली आहे. हा प्रकार काशीवाडी पोलिस चौकीच्या समोर त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री आकराच्या सुमारास घडला आहे. याबाबत जैनुद्दीन यांच्या पत्नीने तक्रारदार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळी राहतात. दिलशाद हिचा विवाह झाला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दारु पिऊन घरी आले. ते दिलशाद हिला शिवीगाळ करु लागले.(relationship) तर त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशाद हिने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अधिकरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दिलशाद फुलारी हिला अटक केली आहे. सहायक उपनिरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.

हेही वाचा

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी औषध दुकाने बंद..?

होर्मुझच्या नाकाबंदीमुळे खरीप हंगामावर सावट

मिरजेत एकाच रस्त्यासाठी तीनवेळा निधी..!