झहीर खान आणि सागरिका घाटगेनं आपल्या राहत्या (ganesh chaturthi)घरी गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी जोडप्यानं त्यांच्या मुलाचा चेहरा रिवल करुन चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं.

गणेश चतुर्थीच्या निमित्तानं संपूर्ण देश गणरायाच्या भक्तीत(ganesh chaturthi) तल्लीन असताना, माजी क्रिकेटपटू झहीर खाननंही आपल्या कुटुंबासह गणेश चतुर्थी साजरी केली. सागरिका घाटगेनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या मुलाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

गणेश चतुर्थीच्या निमित्तानं झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी त्यांच्या मुलाची झलक दाखवली आहे. बुधवारी या जोडप्यानं त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर गणेश चतुर्थीचे फोटो शेअर केले.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये, हे जोडपं त्यांच्या मुलासोबत गणरायाची मनोभावे पूजा करताना दिसतंय. चाहते देखील या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त, माजी अभिनेत्री या पोशाखात खूपच सुंदर दिसतेय. सोनेरी सूट परिधान केलेली, सागरिका तिच्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली दिसतेय.

व्हायरल फोटोंमध्ये, झहीर खानही त्याच्या पत्नीसोबत पूजा करताना दिसतोय. या दरम्यान, झहीर खान देखील पारंपारिक पोशाखात खूप देखणा दिसत होता.

सागरिकानं खास पोस्ट शेअर केली असून कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “गणपती बाप्पा मोरया, आमच्याकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…”

दरम्यान, सागरिका घाटगे आणि झहीर यांनी एप्रिल महिन्यात त्यांच्या मुलाचं स्वागत केलं. आता 6 महिन्यांनंतर, त्यांच्या गोंडस मुलाची एक झलक दोघांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा :

माता न तू वैरिणी! पोटच्या एक महिन्याच्या लेकीचा खून 
३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! धबधब्याच्या काठावर गेला अन्…, VIDEO VIRAL
सावधान! ‘या’ लोकांसाठी नारळ पाणी म्हणजे विषच, एकदा प्यायले तर..