इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

इचलकरंजी शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह (Police)सुरू असतानाच स्टेशन रोडवरील पुतळा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्सवाच्या गर्दीत झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आणि याच गोंधळाचा फायदा घेत काही समाजकंटकांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट दगडफेक केली. या हिंसक घटनेत पोलीस कॉन्स्टेबल सद्दामहुसेन गजबरसाब सनदी यांच्यासह इतर तिघेजण जखमी झाले असून, सनदी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. (Police)अभिवादनासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले असताना काही तरुण नाचत होते, ज्यातून दोन गटांत वाद निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून घटनास्थळी तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी आणि होमगार्ड यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या जमावातील अमोल कटारे या संशयिताने सनदी यांच्यावर दगड फेकून हल्ला केला. या झटापटीत साहिल देठे, आनंदा साठे आणि बादल दौडमनी हे देखील जखमी झाले.

पोलिसांनी या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेतले असून हा हल्ला पूर्वनियोजित (Police) असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, यातील काही संशयितांना चोरीच्या गुन्ह्याखाली चौकशीसाठी यापूर्वी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते, त्याचाच राग मनात धरून हा कट रचला गेल्याची शक्यता आहे. याप्रप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कृष्णा कटारे, अमोल कटारे, सिद्धार्थ विधाते यांच्यासह ८ मुख्य संशयित आणि इतर अनोळखी ५ ते ६ जणांवर सरकारी कामात अडथळा आणणे व प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा

१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?

अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर