छत्रपती संभाजीनगर मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नवजात बालकाला(baby) जन्मदेताच निर्दयी आईनेच रस्त्यावरील कचर्यात फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घरातच मुलाला जन्म देऊन निर्दयी आईने रस्त्यावरील कचऱ्यात फेकले. त्यांनतर त्या बालकाचे कुत्र्याने लचके तोडण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाला सुखरूप पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरात पती पासून २४ वर्षीय गर्भवती तरुणी वेगळी राहत होती. त्या तरुणीने एकटीने बाळाला(baby) जन्म दिला आहे आणि कुटुंबापासून ही बाब लपवण्यासाठी घरातच बाळाची नाळ कापून जन्मानंतर अवघ्या दोन तासात गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. विशेष म्हणजे पहाटेच्या थंडीत या गोणीचे कुत्रयांनीं दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला.

यात ही गोणी एकदा बसखाली देखील आली. तरीही तीनदा संकट ओढवूनही सतर्क नागरिकांमुळे बाळ सुखरूप राहिले. गुरुवारी पहाटे 5:30 वाजता पुंडलिकनगर गजानन महाराज मंदिर रस्त्यावर ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करताच तिने क्रूर कृत्याची कबुली दिली. गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो!

भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक

एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स