उत्तरप्रदेशच्या एटामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई बाबा बाहेर गेले म्हणून १६ वर्षाच्या मुलीने प्रियकराला घरी(home) बोलावलं. त्याचवेळी मुलीचा धाकटा भाऊ तिथे आला आणि त्याने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं. आपल्या धाकट्या भावाने अश्या अवस्थेत पाहिलं हे पाहून मुलगी गोंधळून गेली. तिने प्रियकराच्या मदतीने भावाची हत्या केली.

एका १६ वर्षीय मुलीचे बाबा शेतावर गेले होते आणि आई बाहेर गेली होती. तिने आपल्या प्रियकर विनयला घरी(home) बोलावलं. त्यावेळी तिच्या धाकट्या भावाने दोघांना संबंध ठेवताना पकडलं. तो त्यांच्याजवळ गेला आणि आरडाओरडा करण्याची धमकी दिली. त्याचा आवाज बंद करण्यासाठी विनयने त्याचं तोंड दाबलं. मुलीने त्याचा गळा आवळला. सर्व हालचाल थांबेपर्यंत मुलगी त्याचा गळा दाबत राहिली. त्यानंतर विनय घटनास्थळावरुन फरार झाला. दुसऱ्या दिवशी आई – बाबा घरी परतले, त्यावेळी त्यांना मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. आईने हंबरडाच फोडला, लगेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा स्पष्ट झाले की हत्या गळा दाबण्यामुळे झाली आहे. बहिणीची चौकशी केली तेव्हा तिने दिशाभूल करणारी उत्तर दिली. पण पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच तिने गुन्हयाची कबुली दिली. जलेसरचे SHO सुधीर कुमार सिंह यांनी ही माहिती दिली.

मृतक हा चौथ्या वर्गात शिकत होता. आरोपी मुलीने शाळा सोडली आहे. प्रारंभिक चौकशीत मुलगी त्याच गावात राहणाऱ्या विनय शर्मा (20) सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच समजलं. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर तिने आधी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर कुटुंबियांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. विनय शर्माला मंगळवारी तुरुंगात पाठवण्यात आलय तर मुलीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलय.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आधी स्वतःच्या ४ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला नंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणातून या व्यापारी दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांनी मुलाला विषारी पदार्थ खायला दिला आणि गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली असून घटनास्थळी त्यांना एक सुसाईड नोट भेटली.

हेही वाचा :

महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल