इलेक्ट्रिक(electric) वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर टीव्हीएस कंपनीने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांची नवी इलेक्ट्रिक स्कूटर ‘टीव्हीएस ऑर्बिटर’ बाजारात लाँच केली असून, स्टायलिश डिझाइन, दमदार बॅटरी आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह ती ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १५८ किमी पर्यंत धावेल. सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹९९,९०० ठेवण्यात आली आहे. ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया सुरू झाली असून ग्राहकांना ही स्कूटर ६ रंगांच्या पर्यायात मिळणार आहे.

टीव्हीएसने ही स्कूटर खास बजेट फ्रेंडली सेगमेंट लक्षात घेऊन सादर केली आहे. त्यामुळे परवडणाऱ्या किंमतीत आधुनिक फीचर्स असलेली इलेक्ट्रिक स्कूटर शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे.

नवीन टीव्हीएस ऑर्बिटरची स्पर्धा बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या एथर रिझ्टा, ओला एस१ एक्स, विडा व्हीएक्स२ आणि बजाज चेतक यांसारख्या लोकप्रिय ई-स्कूटर्सशी (electric)होणार आहे.

हेही वाचा :

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
‘फडणवीसांनी मराठ्यांना दिलेलं 16% आरक्षण उद्धव ठाकरेंमुळे गेलं’, ‘राऊतांची लायकी…’
उंटाला डिवचणं पडलं महागात! वाळवंटाच्या राजाने तरुणांना दाखवला रौद्रावतार, VIDEO VIRAL