अंतराळवीर(Astronaut) आणि अंतराळ क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळी, खगोलशास्त्रज्ञ सध्या एका अशा शोधाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत जिथं पृथ्वीचं अस्तित्वं असणाऱ्या सूर्यमालेपलिकडेसुद्धा एक वेगळं जग अस्तित्वात असून सतत त्या जगातून पृथ्वीवर संकेत येत असल्याचं सिद्ध झालं आहे.

नासा अर्थात अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या संशोधकांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप नावाच्या अतिशय कार्यक्षम अशा दुर्बिणीतून K2-18b नावाच्या एका दुसऱ्या आकाशगंगेच्या वातावरणीय लहरींमध्ये काही रायायनिक बदल पाहिले. साधारण 124 प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या या विश्वातून मिळालेली ही चिन्हं बऱ्याच गोष्टी सूचित करत आहेत.

दुर्बिणीनं केलेल्या निरीक्षणानुसार dimethyl sulphide आणि dimethyl disulphide हे दोन असे वायू आहेत ज्यांची निर्मिती सजीव मायक्रोब algae पासून होते. हेच वायू त्या ग्रहावरही आढळले. K2-18b हा पृथ्वीपेक्षा अडीचपट मोठा ग्रह असून, त्या ग्रहाचं वेगळ्या सूर्यमालेतील स्थान पाहता तिथं द्रव रुपात पाण्याचे साठे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं अभ्यासकांचं मत. या ग्रहावरील वायूशी झालेला संपर्क पाहता तिथं सजीवसृष्टीचा वावर आणि प्रचंड महासागरही असू शकतात.

‘हा एक अतिशय सबळ पुरावा असून, तिथं जीवसृष्टीचं अस्तित्वं असूही शकतं. मी वास्तवात असं म्हणू शकतो की आपण पुढील एक ते दोन वर्षात याबाबतचा निष्कर्षही काढू शकतो’, अशी महत्त्वपूर्ण माहिती केम्ब्रिज विद्यापीठाच्या निक्कू मधुसूदन या astrophysicist यांनी दिली, ज्यांनी या निरीक्षणाचं नेतृत्त्वं केलं. आश्चर्याची बाब म्हणजे वरील वायुंच्या हालचाली त्या ग्रहावर पृथ्वीपेक्षा कैक पटींनी जास्त असून त्याचमुळं एलियनचं अस्तित्वं आणि जीवसृष्टीबाबतचे तर्क खरे ठरू शकतात.

दरम्यान, एलियनं अस्तित्वं, सापडणारे पुरावे हे अंतिम संशोधन नसून त्यावर आता नव्यानं संशोधन केलं जात असून या गोष्टीची नोंद घ्यावी असंही संशोधकांनी सूचित केलं. परग्रहावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाविषयी अंतिम विधान करण्यासाठी संशोधकांना त्यांच्या निरीक्षणावर आणि पुराव्यांवर 99.99999% टक्के ठाम असावं लागणार आहे. सध्या फक्त वायूच्या संकेतांवरून अंतिम निष्कर्ष काढणं योग्य नसेल असं ज्येष्ठ तज्ज्ञांचं मत ठरत आहे. त्यामुळं आता या संशोधनाचा नवा टप्पा नेमका कसा असेल आणि त्यातून होणतं गूढ उकलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने K2-18b च्या वातावरणात मिथेन, कार्बन डायऑक्साइड आणि संभाव्यपणे डायमिथाइल सल्फाइड आणि डायमिथाइल डायसल्फाइड या वायूंचे संकेत शोधले(Astronaut). पृथ्वीवर DMS आणि DMDS हे वायू फक्त सजीव प्राण्यांद्वारे तयार होतात, विशेषतः समुद्री सूक्ष्मजीवांद्वारे. K2-18b वर या वायूंची उपस्थिती जीवसृष्टीच्या शक्यतेचा संकेत आहे.

हेही वाचा :

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
‘फडणवीसांनी मराठ्यांना दिलेलं 16% आरक्षण उद्धव ठाकरेंमुळे गेलं’, ‘राऊतांची लायकी…’
उंटाला डिवचणं पडलं महागात! वाळवंटाच्या राजाने तरुणांना दाखवला रौद्रावतार, VIDEO VIRAL