आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone)असतो. मुलं असोत की मोठी माणसं, मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. मात्र, सर्वात मोठी समस्या म्हणजे बॅटरी पटकन डिस्चार्ज होणे. कीपॅड फोन 2-3 दिवस चार्जिंगशिवाय चालायचे, पण आता स्मार्टफोन दिवसभरातच डिस्चार्ज होतात.

तज्ज्ञांच्या मते, काही साधे उपाय केल्यास बॅटरीची आयुष्य अनेक पटींनी वाढवता येते.फोन लॉक असतानाही वेळ व नोटिफिकेशन्स दाखवणारे हे फीचर बॅटरी लवकर संपवते. दर तासाला 1-2% बॅटरी वापरते. ते बंद करण्यासाठी सेटिंग्ज > डिस्प्ले/लॉक स्क्रीन > ऑलवेज-ऑन डिस्प्ले टॉगल बंद करा.डार्क मोडमुळे स्क्रीन कमी प्रकाश वापरते आणि बॅटरी जास्त काळ टिकते. सेटिंग्ज > डिस्प्ले > थीम > डार्क मोड निवडा.

ब्राइटनेस मीडियम किंवा ऑटोवर ठेवा. स्लीप टाइम 15-30 सेकंदांदरम्यान सेट करा. यामुळे स्क्रीन अनावश्यक चालू राहणार नाही.हे फीचर फोनचा परफॉर्मन्स ॲडजस्ट करून बॅटरी वाचवतं. सेटिंग्ज > बॅटरी > अ‍ॅडॉप्टिव्ह प्रेफरन्सेस > अ‍ॅडॉप्टिव्ह बॅटरी सुरू करा. काही फोनमध्ये हे Extreme Battery Saver नावानेही असते.बॅकग्राऊंडमध्ये चालणारी ॲप्स बॅटरीचा जास्त वापर करतात. त्यांना मर्यादित ठेवल्यास बॅटरी जास्त काळ टिकते(smartphone).

हेही वाचा :

कोणीतरी गुपचूप लेकीचा Video काढतंय; विमानतळावर दीपिकाला कुणकूण लागताच…
तलावात मिळाला २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान दारु विक्री बंद