अभिनेत्री दीपिका पादुकोण काही दिवसांपासून अर्थात तिच्या लेकीच्या(daughter) जन्मानंतर बराचसा वेळ तिच्या संगोपनासाठी देताना दिसत आहे. माध्यमांसमोरही दीपिका सहसा कमीच दिसते. काही महत्त्वाचे कार्यक्रम वगळता तिनं इतर कुठंही हजेरी लावल्याचंसुद्धा पाहायला मिळालं नाही. हीच दीपिका नुकतीच विमानतळावर पाहायला मिळाली आणि हल्लीच्या कथित पापाराझी ट्रेंडमुळं तिची तेथील झलकसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली.

एअरपोर्टवर असणाऱ्या वॅनमध्ये बसून जात असतानाच दीपिकाचा व्हिडीओ कोणा एका व्यक्तीनं टीपला. पण, एरव्ही कॅमेरांसमोर अतिशय सहजपणे वावरणारी दीपिका इथं मात्र काहीशी संकोचलेली आणि अंतत: संतापलेली दिसली. कारण, कोणीतरी गुपचूप तिच्या लेकीचासुद्धा(daughter) व्हिडीओ काढला होता. सोशल मीडियावर दीपिका- रणवीरची लेक, ‘दुआ’चा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. जिथं या सेलिब्रिटी जोडीच्या लेकीचा चेहरा अतिशय धुसरसा दिसला.

आईसोबत बसलेल्या दुआचा व्हिडीओ टीपून तितक्यावरच न थांबता तो थेट सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या नेटकऱ्याला अतिशय लज्जास्पदरित्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तित जीवनातील गोपनीयतेची छेडछाड केल्याप्रकरणी नेटकऱ्यांनी धारेवर धरलं. खुद्द दीपिकाच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा तिनं इशाऱ्यानं आणि नजरेच्या धाकानं रेकॉर्डिंग तातडीनं थांबवण्यास सांगितलं.

आतापर्यंत दीपिका आणि रणवीरच्या विनंतीवरून पापाराझींनी या सेलिब्रिटी जोडीच्या लेकीचे फोटो न टीपल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र इथं काही मंडळी अपवाद ठरली, ज्यांनी अभिनेत्रीच्या विनंतीला धुडकावत दुआचा व्हिडीओ काढला. ज्यांनीज्यांनी हा व्हिडीओ पाहिला, त्यांनी तो तातडीनं सोशल मीडियावरून काढण्यात यावा अशीच विनंती केली. दीपिकानं जाहीरपणे आपल्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ न टीपण्याची ताकीद देऊनही काही मंडळींनी तिला न जुमानता हे कृत्य केल्याचं म्हणत हे अतिशय निंदनीय असल्याचीच प्रतिक्रिया दीपिकाच्या चाहत्यांनी दिली.

फक्त दीपिकाच नव्हे, यापूर्वी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीसुद्धा त्यांच्या मुलांची छायाचित्र आपण टीपू देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र एका क्रिकेट सामन्यादरम्यान विराटची मुलगी वामिका हिचा फोटो माध्यम प्रतिनिधींनी टीपला आणि इथं या जोडीचा संताप अनावर झाला. सोशल मीडियाच्याच माध्यमातून त्यांनी याबाबतची नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली होती. तसाच काहीसा प्रकार आता रणवीर- दीपिकाच्या मुलीसोबतही घडल्यानं काही मर्यादांचं पालन केलं गेलंच पाहिजे हाच सूर सर्व स्तरांतून आळवला जात आहे.

हेही वाचा :

तलावात मिळाला २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान दारु विक्री बंद
चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या