गणेशोत्सवाला 2 दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav)मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणादेखील सज्ज आहे. दरम्यान गणेशोत्सव काळासाठी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कामानिमित्त स्थायिक असलेल्या कोकणवासीय एकत्रित येऊन ग्रुपद्वारे गावी जातात. कोकणात जाणाऱ्या भाविकांनी सुरक्षित प्रवासासाठी आजही एसटीला पसंती देतात. एक महिन्यापूर्वीच बसचे ग्रुप बुकिंग करण्यात येते.

पुणे विभागातून स्वारगेट आणि पिंपरी-आगारातून लालपरी कोकणात सोडले जाते. या बस 24 ते 26 ऑगस्ट या तीन दिवसांत सोडण्यात येणार आहे. शिवाय ज्या भाविकांनी ग्रुप बुकिंग केले नाही, त्यांच्या सोयीने जाणार आहे. त्यांच्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. यंदा मागील वर्षापेक्षा भाविकांकडून जादा बस बुक करण्यात आले आहे. शिवाय अजून मागणी असेल तर एसटी देण्याची सोय एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, गुहागर, सावर्डे, खेड, माणगाव, दापोली, देवरुख, सावंतवाडी, देवगड, लाजा, साखरपा व इतर ठिकाणी आणाऱ्या भाविकांनी 141 एसटी ग्रुपद्वारे बुक केले आहे. यामध्ये 42 प्रवाशांचा ग्रुप आहे.

27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर तारखेपर्यंत खडक, विश्रामबाग फारसखाना या पोलीस स्टेशन हद्दीतील सगळी दारू विक्र राहणार बंद राहणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. तर गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी पुणे जिल्ह्यात पूर्ण दारू बंदी असणार आहे. 5 व्या आणि 7 व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरदेखील दुकान बंद राहणार आहेत.

पुण्याचा भव्य आणि ऐतिहासिक गणेशोत्सव (Ganeshotsav)आता फक्त शहरापुरता मर्यादित न राहता जगभर प्रसिद्ध झालाय. हा उत्सव धार्मिक रूढी आणि सांस्कृतिक परंपरेनुसार साजरा केला पाहिजे, या उद्देशाने यावर्षी डीजे वाजवणाऱ्या गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा जाहिरात दिली जाणार नाही, असे ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी स्पष्ट केले आहे. ‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या संगीतमय पूजा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

मराठी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी होणार आहे. स्थापनेचा मुहूर्त: सकाळी 11:23 ते दुपारी 01:54

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दारू विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत खडक, विश्रामबाग आणि फारसखाना या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दारू विक्री बंद राहणार आहे. गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी पुणे जिल्ह्यात पूर्ण दारूबंदी असेल.

बंदी खडक, विश्रामबाग आणि फारसखाना या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दारू विक्रीवर लागू होईल आणि ती २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत कायम राहील. गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारू विक्री बंद राहणार आहे. तसेच, ५ व्या आणि ७ व्या दिवशीच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर दारू दुकाने पूर्णपणे बंद राहतील.

दारूबंदीचा मुख्य उद्देश गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखणे आणि उत्सव मोठ्या उत्साहात शांततेने साजरा होण्यास मदत करणे आहे. संपूर्ण राज्यात गणेशोत्सव साजरा होत असल्याने पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि या बंदीचे काटेकोरपणे पालन करेल, ज्यामुळे मिरवणुकी आणि उत्सवावेळी कोणतीही अडचण येणार नाही.

हेही वाचा :

चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या
सरकारचा मोठा निर्णय! पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांसाठी ‘ही’ सर्वात मोठी अट रद्द
शेजाऱ्याने दीड वर्षाच्या मुलीला घरी नेले आणि आईने दरवाजा उघडताच….