सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ (video)व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भयावर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये जंगलातील प्राण्यांचे, पशु-पक्षांचे अनेक अद्भुत असे व्हिडिओ पाहायाल मिळतात. असे म्हणतात प्राण्यांना कधीही छेडू नये. त्यांच्या त्यांच्या हालवर एकटे सोडून द्यावे. पण काही लोकांना हे समजत नाही. त्यांच्या अंगात जास्त मस्ती असते. प्राणीप्रेमी बनायच्या नादात ते असे काही करुन बसतात की, त्यांच्याच आंगलट येते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण उंटाला चारा खाऊ घालायाला गेले आहेत, पण त्यांच्यासोबत पुढे असे काही घडले आहे त्यांना तिथून पळता भूई काढवी लागली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये(video) तुम्ही पाहू शकता की, एक उंट आरामात झाडाचा पाला खाताना दिसत आहे. येथे काही तरुणही दिसत आहेत. तरुण मंडळी याचा व्हिडिओ बनवत आहे. यासाठी ते उंटाला एक फांदी तोडून पाणे खायला देण्याचा प्रयत्न करत असतात. एक तरुण उंटापाशी जातो आणि लांबून त्याच्यासमोर फांदी धरतो, उंटाला खाऊ घालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण उंट शांतपणे उभाा असताना, त्यांचे हे कृत्य करणं त्याला पसंत पडत नाही. तो अचानक पण तरुणाच्या मागे धावू लागतो. यामुळे तरुणही तिथून धूम ठोकतात. हा व्हिडिओ अर्ध्यातच संपला आहे. यामुळे पुढे नेमकं काय घडलं हे समजलं नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत व्हिडिओचा आनंद लुटला आहे. एका युजरने म्हटले आहे की, चांगली अद्दल घडली असावी यांना, तर दुसऱ्या एका युजरने कोणी सांगितले होते मस्ती करायला, तर तिसऱ्या एकाने म्हटले आहे शांत प्राणीही भयानक होऊ शकतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ नेमका कुठल आहे. याचा माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा :
इचलकरंजी येथील ‘बीके’ गँगवर हद्दपारीची कारवाई
शाहरुख खान-दीपिकाविरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?
केक कापताच इमारत कोसळली, माय-लेकीचा मृत्यू