सध्या सोशल मीडिया धक्कादायक आणि थरराक व्हिडिओंच स्माशन बनले आहे. रोज कोणाच्या ना कोणच्या मरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ३० सेंकदाच्या रीलच्या (reel)नादात लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. यामध्ये विशेष करुन तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आतापर्यंत अशा धोकादायक स्टंटबाजीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. पण तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण कोरापूट येथील दुदुमा धबधब्यावर मित्रांसोबत फिरायला गेला होता. यावेळी रिलसाठी(reel) तो धबधब्याच्या काठावर गेला. यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे तरुण तिथेच अडकला. त्याला वाचवण्यासाठी बचाव पथकालाही बोलवण्यात आले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अडथळा निर्माण झाला आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पाण्याचा प्रवाह प्रचंड असून तरुण मधोमध केवळ एका दगडावर उभा आहे. पण यावेळी अचानक पाण्याची एक लाट जोरात येते आणि तरुणाला वाहून घेऊन जाते. या थरराक दृश्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सांगण्यात येत आहे की, तरुणाचे वय २२ होते, तो ओडिशाच्या बेरहमपूर येथील राहणारा होता. युट्यूबर म्हणून तो काम करत होता. युट्यूबसाठी व्हिडिओ शूट करायला गेला यावेळी ही घटना घडली.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @viprabuddhi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सोशल मीडियासाठी लोकांना अक्कल घाण ठेवली आहे, असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ इतर लोकांसाठी एक उदाहरण आहे की, सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूज साठी, प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणे किती धोकादायक आहे. तुमचा जीवही जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

शेट्टी अण्णा भडकले; आर्टिस्टला सगळ्यांसमोर झापले, पाहा VIDEO
मराठा आंदोलनाला हायकोर्टाची मनाई….
TVS शोरुम आणि सर्व्हिंस सेंटरला आग!