सुनील शेट्टी हा एक असा अभिनेता आहे ज्याची शैली आणि संवाद डिलिव्हरी खूप कॉपी केली जात असे. बऱ्याचदा त्याच्या ‘धडकन’ चित्रपटातील आणि इतर काही चित्रपटांमधील संवादांची नक्कल केली जाते. बऱ्याचदा सुनील शेट्टीसमोरही काही आर्टिस्ट त्यांची नक्कल करताना दिसले आहेत. तसेच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुनील शेट्टीची नक्कल करताना एक कलाकार दिसत आहे. आणि यामध्ये नंतर अभिनेता त्याच्यावर भडकलेला (angry)दिसत आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

हा व्हायरल व्हिडिओ भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाचा आहे. एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता सुनील शेट्टीही तिथे उपस्थित होता. अभिनेत्या समोर एका कलाकाराने त्याची नक्कल केली आणि त्याच्या शैलीत काही संवाद म्हटले. पण यावेळी अभिनेत्याला ही मिमिक्री अजिबात आवडली नाही आणि तो कलाकारावर रागावला. व्हायरल व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी स्टेजवर एका मिमिक्री कलाकाराला सांगत असल्याचे दिसत आहे, ‘हा भाई साहेब वेगवेगळे संवाद बोलत आहे जे माझ्या आवाजात नाहीत. मी कधीही इतकी वाईट मिमिक्री पाहिली नाही. जेव्हा सुनील शेट्टी बोलतो तेव्हा तो माणसासारखा बोलतो. हा लहान मुलासारखा बोलत होता.’ असे म्हणून अभिनेत्याने त्याला फटकारले आहे.

अभिनेत्याने कलाकाराला पुढे सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मिमिक्री करता तेव्हा तुम्ही ते चांगले करावे. तुम्ही कोणाचेही वाईट अनुकरण करू नये. यावर, मिमिक्री कलाकाराने अभिनेत्याची माफी मागितली आणि दावा केला की तो अभिनेत्याची मिमिक्री करण्याचा प्रयत्न करत होता. यावर, अभिनेत्याने म्हटले की प्रयत्नही करू नकोस बेटा. सुनील शेट्टी होण्यासाठी अजूनही बराच वेळ आहे. केस बांधल्याने कोण सुनील शेट्टी होत नाही. सुनील शेट्टी बनण्यासाठी तुम्हाला खूप पुढे जावे लागेल. सुनीलने मिमिक्री कलाकाराला तू अजून लहान आहेस असेही म्हटले. अभिनेत्याच्या या प्रतिक्रियेवर मिमिक्री कलाकाराला खूप लाज वाटू लागली.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वादविवादही सुरू झाला आहे. कारण एकीकडे, अनेक लोक सुनील शेट्टीचे समर्थन करत आहेत आणि त्याला प्रतिसाद देत आहेत. तर दुसरीकडे, अनेकांना सुनील शेट्टीचे हे वर्तन योग्य वाटले नाही. लोकांचे असे मत आहे की सुनील शेट्टीने एका छोट्या कलाकारासोबत असे वागायला नको होते(angry).

हेही वाचा :

मराठा आंदोलनाला हायकोर्टाची मनाई….
TVS शोरुम आणि सर्व्हिंस सेंटरला आग!
घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर ही अभिनेत्री पडली पुन्हा प्रेमात…..