सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे आणि धक्कादायक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज(Video) नेहमीच आपल्याला थक्क करत असतात आणि आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील महिलेच्या कृत्येने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील काही काळापासून दारूची तस्करी, बेकायदेशीर दारू विक्री अशा प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात महिलेच्या कृत्येने सर्वांनाच धक्का दिला आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

ही घटना मोहालीच्या लखनौर गावात घडून आली आहे. गुडी नावाच्या महिलेवर बेकायदेशीर दारू विक्रीचा आरोप होता ज्यामुळे तिला अटक करायला पोलीस तिच्या घरी पोहचले. तिच्याकडे चंदीगडहून आणलेली दारूची पिशवी सापडली, ज्यामुळे बेकायदेशीररित्या दारू बाळगण्याच्या आरोपाखाली तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिच्याजवळील सर्व दारू जप्त करण्यात आली. पण जेव्हा पोलीस ही सर्व प्रक्रिया करत होते तेव्हा महिलेने लज्जास्पद कृत्य करत पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात पोलीस महिलेच्या घरी पोहचताच ती रागातच घरातून बाहेर येत असल्याचे दिसते. यानंतर ती पोलिसांसमोर आपला ड्रेस फाडते आणि अश्लीलरित्या त्यांना खरीखोटी सुनावू लागते. व्हिडीओच्या शेवटी अखेर महिला पोलीस अधिकारी महिलेला पकडताना दिसते. ज्यामुळे हा हाय व्होल्टेज ड्रामा तिथेच थांबतो आणि यशस्वीरीत्या महिलेला अटक केली जाते.

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @brut.india नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ‘पोलिसांच्या छाप्यात बेकायदेशीर दारू विकणाऱ्या एका महिलेला पकडण्यात आले’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्याचबरोबर व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिचा कुर्ता म्हणत असेल पण मला का फाडलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला असं खरंच वाटतंय का की ती खूप फास्ट पळत आहे”.हे व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

हेही वाचा :

श्री गणेश राज्य महोत्सवाला यंदा निवडणुकांचे तोरण…..!
या भारतीय खेळाडूने घेतला संघ सोडण्याचा निर्णय
मीराबाई चानूचं जबरदस्त पुनरागमन! राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक