भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने एक वर्षाच्या विश्रांतीनंतर शानदार पुनरागमन करत राष्ट्रकुल भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक(gold medal) पटकावले. टोकियो ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाईने सोमवारी महिलांच्या 48 किलो वजनी गटात नवा विक्रम प्रस्थापित करत पहिल्या स्थानावर मजल मारली. 31 वर्षीय मीराबाईने यापूर्वी 49 किलो गटात खेळायची होते, परंतु हा गट आता ऑलिंपिक स्पर्धेतून वगळण्यात आल्याने तिने 48 किलोमध्ये पुनरागमन केले. या गटात तिने एकूण 193 किलो (84 किलो स्नॅच + 109 किलो क्लीन अँड जर्क) उचलून सुवर्णपदक जिंकले. यासोबतच एकूण, स्नॅच आणि क्लीन अँड जर्क या तिन्ही प्रकारांत विक्रम मोडले.

मीराबाई गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकनंतर पहिल्यांदाच स्पर्धेत उतरली. तेव्हा ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती. दुखापतीमुळे वर्षभर विश्रांती घेतल्याने तिची तयारीही उशिराने झाली होती. स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात (84 किलो) ती थोडी डळमळली आणि गुडघ्यात त्रास जाणवला. पण दुसऱ्या प्रयत्नात तिने हे वजन सहज उचलले. तिसऱ्या प्रयत्नात 89 किलो उचलण्यात ती अपयशी ठरली. क्लीन अँड जर्कमध्ये तिने 105 किलोने सुरुवात करून 109 किलो सहज पार केले. मात्र अंतिम प्रयत्नात (113 किलो) ती यशस्वी ठरू शकली नाही.

या गटात मीराबाईला फारशी स्पर्धा नव्हती. मलेशियाच्या इरीन हेन्रीने 161 किलो (73 + 88) उचलत रौप्यपदक जिंकले. तर वेल्सच्या निकोल रॉबर्ट्सने 150 किलो (70 + 80) उचलत कांस्यपदक पटकावले. मीराबाईने याआधीही 48 किलो गटात राष्ट्रकुल स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकले आहे. मात्र 2018 नंतर ती 49 किलो गटात उतरली होती. यंदा पुन्हा 48 किलो गटात परत येत तिने विजेतेपद आपल्या नावे केले(gold medal).2014 सालच्या राष्ट्रकुल खेळांमध्ये (ग्लासगो) तिने रौप्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले.

टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. तिने राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्ण व रौप्यपदके पटकावली आहेत तसेच राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये अनेक वेळा विक्रम केले आहेत. पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न (आता मेजर ध्यानचंद खेलरत्न) आणि अर्जुन पुरस्कार हे भारत सरकारचे सर्वोच्च क्रीडा सन्मान तिला प्राप्त झाले आहेत. ती प्रामुख्याने 48 किलो आणि 49 किलो वजनी गटात स्पर्धा करते.

हेही वाचा :

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत
माेठी बातमी! ‘काेल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रमाणपत्रांची फेरपडताळणीचे आदेश
तू कुण्या राजकारण्याच्या नादी लागशील पण माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा भाजपच्या महिला नेत्याला इशारा