मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा तापलेल्या राजकारणात आंदोलन (follow)नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना थेट इशारा दिला आहे. वाघ यांनी “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान” केल्याचा आरोप करताच जरांगेंनी प्रतिउत्तर दिलं आणि “तू कुण्या राजकारण्याच्या नादी लागशील पण माझ्या नादी लागू नको; मी सगळं बिऱ्हाड उठवीन” अशा शब्दांत इशारा दिल्याने खळबळ उडाली.या पार्श्वभूमीवर जरांगेंनी फडणवीसांवरही टीका करत “बाईच्या पदराआड लपू नका” असं म्हटलं, मात्र “आईवर काही शब्द बोललो असेल तर ते विधान मी मागे घेतो” असं स्पष्ट करत त्यांनी माघारही दाखवली. तरीही “सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, कुरघोडी शोधल्या जात आहेत” अशी टीका कायम ठेवत ते 27 ऑगस्टपासूनच्या मुंबई कूचची तयारीत आहेत.

जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी सकाळी आंतरवाली सराटी येथून मार्गस्थ होण्याची घोषणा केली आहे. पैठण–शेवगाव–पांढरीपूल–अहिल्यानगर–आळेफाटा असा मार्ग ठरवण्यात आला असून “कोणालाही त्रास नको” हा विचार पुढे ठेवत पर्यायी रस्तेही नजरेत असल्याचं ते म्हणाले. (follow)दिवसअखेरीस शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम ठेवण्यात येणार आहे.त्यांनी सरकारला 26 ऑगस्टपर्यंत अंमलबजावणीची ‘डेडलाइन’ देत इशारा दिला—“त्या आधी निर्णय झाला तर ठीक; नाही तर आंतरवाली सराटी सोडल्यानंतर चर्चा नाही, थेट मुंबईतच चर्चा.” या भूमिकेमुळे पुढील दोन दिवसांतील सरकारची चाल निर्णायक मानली जात आहे.

चित्रा वाघांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी “आमच्या आई-बहिणींवर दगडफेक झाली तेव्हा तुम्ही कुठे होता?” असा सवाल केला. फडणवीसांवर “राजकीय स्वार्थासाठी आईला पुढे करणं” (follow)असा टोला लगावत त्यांनी सरकारवर आरक्षण मुद्दा टाळण्याचा आरोप केला. त्याचवेळी “मी आरक्षण घेणारच” असा ठाम पवित्राही त्यांनी जाहीर केला.राजकीय वातावरणात वाढलेल्या तापमानात जरांगेंचं वक्तव्य आणि मुंबईकडे कूच या दोन्ही घडामोडी निर्णायक मानल्या जात आहेत. सरकारकडून तातडीचे पाऊल न पडल्यास आंदोलन अधिक आक्रमक वळण घेण्याची शक्यता वर्तवली जाते; तर समर्थकांकडून ‘आरक्षणाची अंमलबजावणी’ हा एकमेव मार्ग असल्याचा पवित्रा कायम ठेवला जातो.

हेही वाचा :

कोणीतरी गुपचूप लेकीचा Video काढतंय; विमानतळावर दीपिकाला कुणकूण लागताच…
तलावात मिळाला २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान दारु विक्री बंद