डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना, आशा भोसलेंना निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या (farewell) निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चाहत्यांसह अनेक मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती. या वेळी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता.

आशा ताईंना अखेरचा निरोप (farewell) देताना सचिनच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते.संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली होती. त्यांचा आवाज, त्यांची शैली आणि त्यांच्या गाण्यांनी प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं.

सचिन तेंडुलकर यांचं आशा (farewell) भोसले यांच्याशी खास जिव्हाळ्याचं नातं होतं, त्यामुळे त्यांना निरोप देताना त्यांची भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.या भावूक क्षणांनी उपस्थितांनाही हेलावून टाकलं. एका युगाचा अंत झाल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आशा भोसले यांच्या जाण्याने संगीतविश्वात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचं अनेकांनी व्यक्त केलं.