जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांनी सोयीच्या बदलीसाठी (transfer)दिव्यांग व गंभीर आजारी असलेली प्रमाणपत्रे सादर केली आहेत. सदरची प्रमाणपत्रे खोटी असल्याचा आरोप होऊन तक्रारी झाल्याने शासनाने या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे ३५६ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले.दिव्यांग व आजारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची फेर पडताळणी करून ते बदलीस पात्र आहेत का याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांना सादर करण्यास सांगितले आहे. प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित शिक्षकांना ई-मेलने बदलीचे आदेशही मिळाले आहेत. अशातच या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी होणार असल्याने शिक्षक वर्ग हवालदिल झाला आहे.

२०१८ पासून प्राथमिक शिक्षकांच्या संवर्गानुसार ऑनलाइन बदल्या केल्या जात आहेत. संवर्ग एक मध्ये पक्षघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, विविध आजाराने ग्रस्त शिक्षक, घटस्फोटित व परितक्त्या महिला शिक्षिका आदी शिक्षकांचा समावेश होतो. संवर्ग एकमधील शिक्षकांना बदल्यात प्रथम प्राधान्य दिले जाते. (transfer)त्यामुळे संवर्ग एकमधून विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे बदलीसाठी दाखल केलेल्या प्रमाणपत्राची आता सखोल तपासणी होणार आहे.
दिव्यांग प्रमाणपत्रात काही संशय आढळल्यास संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्य चिकित्सकाकडून तपासणी केली जाणार आहे. दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे असणे आवश्यक आहे. तसेच विविध आजाराबाबत प्रमाणपत्रात अनियमितता आढळल्यास सदर शिक्षकाचीही जिल्हा शल्यचिकित्सकामार्फत फेर तपासणी केली जाणार आहे. प्रमाणपत्रात अनियमितता आढळल्यास अशा शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. संबंधित शिक्षकास निलंबित करून शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश ग्राम विकास विभागाने दोन महिन्यांपूर्वी दिले आहेत.

संवर्ग एक मध्ये बदलीसाठी लाभ घेतलेल्या ३५६ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची(transfer)चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक २११ दिव्यांग प्रमाणपत्रे आहेत. यामध्ये करवीर, शिरोळ व राधानगरी तालुक्यातील शिक्षकांची संख्या अधिक आहे. त्यानंतर ह्रदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी किंवा त्यांचे जोडीदार ५०, मेंदूचा आजार असलेले ३७, कर्करोग झालेले कर्मचारी व त्यांचे जोडीदार २४ आहेत. खरी तपासणी व फेरपडताळणी ही दिव्यांग प्रमाणपत्रांचीच होऊ शकेल. तपासणीनंतर किती खरी व किती खोटी प्रमाणपत्रे हे समजून येईल.
हेही वाचा :
कोणीतरी गुपचूप लेकीचा Video काढतंय; विमानतळावर दीपिकाला कुणकूण लागताच…
तलावात मिळाला २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान दारु विक्री बंद