कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : जिल्ह्यातील काँग्रेसचे(Congress) ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांच्या दोन्ही पुत्रांनी पी एन गटासह अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शक्ती प्रदर्शनासह प्रवेश केला आहे. करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात हा कार्यक्रम झाला. राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे सत्तेत असलेल्या महायुतीचा एक भाग आपण होणार असलो तरी महायुतीच्या संभाव्य उमेदवाराविरुद्ध (शिंदे शिवसेना) 2019 ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले आहे. या निमित्ताने करवीर मधील राजकीय समीकरण बदलणार आहे.

“पी एन गट” राष्ट्रवादीचे गेल्यामुळे करवीर मध्ये राष्ट्रीय काँग्रेस(Congress)”खालसा” होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी पराभव झाल्यानंतर राहुल पाटील यांना पॉलिटिकल डिप्रेशन आले होते. राज्याच्या राजकारणात आता काँग्रेसला फारसे भवितव्य उरलेले नाही. हा पक्ष आता सत्तेच्या वर्तुळात जाऊ शकत नाही. एकूणच लोकांची कामे करावयाची असतील, कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर सत्तेत असलेल्या पक्षात जायला हवे असा विचार करून पी एन पुत्रांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतानाच पाटील पुत्रांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगताना आपला “समरजितसिंह घाटगे”होणार नाही हे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके हे विजयी झाले आहेत. ते महायुतीचे आमदार आहेत. आणखी चार साडेचार वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार असणार आहोत. हे स्पष्ट करून प्रवेशाच्या आधीच बंडखोरीचे संकेत त्यांनी दिले आहेत.
आधीच्या सांगरूळ आणि नंतरच्या करवीर विधानसभा मतदारसंघात पी एन पाटील यांचे सासरे श्रीपतराव बोंद्रे यांची हुकूमत होती. त्यांनी हा मतदारसंघ काँग्रेससाठी चांगला मजबूत आणि सुरक्षित केला होता. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसची मजबूत पकड आहे. पी एन पाटील गट म्हणून इथे काँग्रेस ओळखली जात होती. पण आता पी एन पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही पुत्रांनी पी एन पाटील गटच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. परिणामी या मतदारसंघातील काँग्रेस आता क्षीण झाली आहे. काँग्रेसचे(Congress) जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जातो.
2029 मध्ये विधानसभा मतदार संघाची संख्या वाढणार आहे. संसदेने संमत केलेल्या महिलांसाठी 50% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचा भूगोल बदलणार आहे, आरक्षण सोडत घेतली जाणार आहे. विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळेही राजकीय प्रवाह बदलणार आहेत. आजची स्थिती उद्या राहणार नाही असा विचार करून पाटील पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा. विधानसभा मतदारसंघांचा भूगोल बदलला नाही, महायुतीच्या जागा वाटपात करवीर मतदारसंघ हा पुन्हा शिवसेना शिंदे गटासाठी सोडला गेला किंवा तसेच घडणार आहे. त्यामुळे मग पी एन पाटील गटाची अडचण होणार आहे.

राज्यात राजकारण बदलल्यानंतर त्याचा फटका कागल मध्ये समरजीत सिंह घाटगे यांना जसा बसला तसाच फटका राहुल पाटील यांना बसणारच नाही असे म्हणता येणार नाही. पण त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वीच 2029 चे या मतदारसंघातील उमेदवार आपणच असणार आहोत.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहोत असे जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र अडचण होणार आहे. आणखी साडेचार वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका महायुतीकडूनच लढवल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. तसे झाले तर करवीर विधानसभा मतदारसंघ हा शिंदे शिवसेना गटाला सोडावा लागणार आहे. आणि अपेक्षेप्रमाणे चंद्रदीप नरके हेच पुढचे उमेदवार असणार आहेत. तेव्हा राहुल पाटील यांचा समरजीत सिंह घाटगे होणारच नाही असे म्हणता येणार नाही.
पी एन पाटील हे राष्ट्रीय काँग्रेसचे(Congress) जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते. सर्वाधिक काळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद त्यांच्याकडे होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विश्वासू वर्तुळातील ते होते. ते काँग्रेसशी एकनिष्ठ होते. प्रतिकूल राजकिय परिस्थितीतही त्यांनी वेगळा राजकीय विचार केला नव्हता. पण त्यांच्या वारसदारांनी आपली राजकीय वाटचाल वेगळी असल्याचे जाहीर करून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे असे म्हणता येईल.
हेही वाचा :
मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI ला ₹3580000000 चा फटका? टीम इंडियावरही परिणाम!
इचलकरंजीत मोठ्या उत्साहात अटल महोत्सव साजरा होणार