अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होल भाषणात फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदर कपातीचे संकेत देण्यात आले आहेत. यााचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (stock market)होत असल्याचं पाहायला मिळत आहे. २५ ऑगस्ट रोजी आज जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९५३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५५ अंकांनी जास्त होता.

शुक्रवारी शेअर बाजारात घसरम झाल्याचं पाहायला मिळालं. बेंचमार्क निर्देशांकांनी त्यांची सहा दिवसांच्या विजयी मालिकेला ब्रेक लावला. सेन्सेक्स ६ ९ ३.८६ अंकांनी म्हणजेच ०.८५% ने घसरून ८१,३०६.८५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २१३.६५ अंकांनी म्हणजेच ०.८५% ने घसरून २४,८७०.१० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ६०६.०५ अंकांनी किंवा १.०९% ने घसरून ५५,१४९.४० वर बंद झाला.

फेडरल चेअर जेरोम पॉवेल यांनी सप्टेंबरमध्ये दर कपातीचे संकेत दिल्यानंतर सोमवारी भारतीय रुपया अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. १ महिन्याच्या नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्डवरून असे दिसून आले की रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८७.३६ ते ८७.३८ च्या श्रेणीत उघडेल, जे शुक्रवारी ८७.५३ होते. गेल्या आठवड्यात रुपया ८७ च्या वर गेला आणि नंतर नीचांकी पातळीवर पोहोचला(stock market).

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांसाठी गुंतवणुकदारांना कॉनकोर , सिप्ला आणि अपोलो टायर्स या शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणुकदार इंटरग्लोब एव्हिएशन, मॅक्स हेल्थकेअर, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, एमसीएक्स , इंडियन ओव्हरसीज बँक , जेके सिमेंट, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज , चोलामंडलम फायनान्शियल सर्व्हिसेस, भारतीय हॉटेल्स, येस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, रेलटेल कॉर्प, जीएमआर पॉवर अँड इन्फ्रा, ब्रिगेड एंटरप्रायझेस, टीव्हीएस मोटर या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होल भाषणानंतर, गेल्या आठवड्यात अमेरिकन शेअर बाजाराने तेजी दर्शविली, तर आशियाई बाजारांनी तेजी दर्शविली. डाऊ जोन्सने विक्रमी उच्चांक गाठला. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणुकदारांना तीन इंट्राडे स्टॉकची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आयसीआयसीआय बँक , कोफोर्ज आणि सुला व्हाइनयार्ड्स यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI ला ₹3580000000 चा फटका? टीम इंडियावरही परिणाम!
इचलकरंजीत मोठ्या उत्साहात अटल महोत्सव साजरा होणार
 दिवसा आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत