इचलकरंजी शहरात यंदाही अटल महोत्सव(Mahotsav) मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवाची संपूर्ण तयारी जोरात सुरू झाली आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या अटल महोत्सवाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभत असून यंदाचा महोत्सव आणखी आकर्षक आणि सर्वांसाठी संस्मरणीय ठरणार आहे. हा महोत्सव गणेश चतुर्थीच्या दरम्यान पार पडणार आहे.

माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या संकल्पनेतून आणि माजी आमदार प्रकाश अण्णा आवाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यमान युवा आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव साजरा होणार आहे. भाजपा शहराध्यक्ष शशिकांत मोहिते, युवा अध्यक्ष प्रमोद बचाटे यांच्या संयोगाने हा महोत्सव पार पडणार असून यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्रीरंग खवरे, ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने, युवा अध्यक्ष सचिन पोवार व ग्रामीण युवा अध्यक्ष अमर खोत यांचेही मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

यंदाच्या अटल महोत्सवाचे (Mahotsav)आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महोत्सवाच्या माध्यमातून विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यासोबतच सार्वजनिक गणेश मंडळांचे स्पर्धात्मक नंबर काढण्यात येणार आहेत. हा महोत्सव सर्वसामान्य कष्टकरी, गोरगरीब, श्रमिक महिला व कामगार वर्गालाही परवडेल अशा पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळणी, युवावर्गासाठी आकर्षक खेळ तर सर्वांसाठी नाममात्र दरात—20, 30, 40, 50 रुपयांत—खाद्यपदार्थांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक समाजघटकाला या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.

या महोत्सवात महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र गार्ड, सुरक्षित पार्किंग व्यवस्था, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खाऊ गल्ली, स्वच्छ पाणी, स्वच्छतेची काळजी तसेच गर्दी व गोंधळ होऊ नये म्हणून स्वतंत्र सुरक्षा यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे.या महोत्सवाला हेमंत वरुटे, अजित माने तसेच शिवसाई इव्हेंट मॅनेजमेंट अँड अम्युझमेंट यांचे सहकार्य लाभणार आहे.

अटल महोत्सवाचे आयोजक श्री शुभम प्रल्हाद बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शहर व परिसरासाठी हा महोत्सव आनंदाची पर्वणी ठरणार असून लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या महोत्सवाचा मनसोक्त आनंद घ्यावा,” असे आवाहन करण्यात आले आहे.इचलकरंजीकरांसाठी हा अटल महोत्सव खऱ्या अर्थाने उत्साह, आनंद आणि ऐक्याचा सोहळा ठरणार आहे.

हेही वाचा :

 दिवसा आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
‘काँग्रेस आमदारानं मेसेज करून शारीरिक संबंधाची मागणी..’ ट्रान्सजेंडरकडून गंभीर आरोप
“रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं?”, ठाकरेंचा आक्रमक सवाल