केरळमधील काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.(demands)मल्याळम अभिनेत्रीनंतर आता एका ट्रान्सजेंडरनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केरळमधील सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अवंतिका विष्णू यांनी राहुल ममकूटाथिल यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.मल्याळम अभिनेत्री रिनी जॉर्जनं काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अश्लील मेसेज पाठवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. राहुलनं अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलं. नंतर अभिनेत्रीनं पुढे येऊन याबाबत खुलासा केला. अभिनेत्री आणि आमदाराचा प्रकरण समोर आल्यानंतर ट्रान्सजेंडरनं आमदाराबाबत खुलासा केला.

या प्रकरणानंतर २२ ऑगस्ट रोजी राहुल यांनी सकाळी काँग्रेसच्या केरळ युवा शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच अभिनेत्री रिनी जॉर्ज, अवंतिका विष्णू यांना न्यायालयात त्यांची बाजू मांडण्याची मागणी केली. (demands)अवंतिकाने दिलेल्या माहितीनुसार, तिनं यापूर्वीही काँग्रेस पक्षासमोर राहुल ममकूटाथिल यांच्याविरोधात तक्रार केली होती.बैलांसमोर नाचवल्या नर्तिका, ग्रामपंचायतीच्या छतावर डान्सचा व्हिडिओ व्हायरलमात्र, त्यावेळेस आमदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अवंतिका म्हणाली, ‘जून २०२२ साली त्रिक्काकारा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राहुल ममकूटाथिलशी भेट झाली. केरळ पोटनिवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यानं फेसबुक मेसेंजरवर हाय पाठवला. नंतर संवाद झाला. राहुल ममकूटाथिल यांनी टेलिग्रामवर मेसेज केला.’

‘टेलिग्रामवर मेसेज करून त्यानं अश्लील मेसेज पाठवले. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मागणी केली. वासनेची भूक पूर्ण करण्यासाठी त्यानं बंगळूरू किंवा हैदराबादमध्ये भेटण्यास सांगितले. (demands)त्यावेळेस राहुल ममकूटाथिल मोठ्या पदावर होते. त्यामुळे मी गप्प राहिले’, असं अवंतिका म्हणाली.दरम्यान राहुल ममकूटाथिल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी अवंतिकाच्या प्रश्नांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अभिनेत्री रिनीच्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रिनी यांनी केलेले आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. ‘ती अभिनेत्री माझी मैत्रीण आहे. तिने ज्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे, ती मीच आहे असं मला वाटत नाही. ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि राहिल’, असं राहुल ममकूटाथिल म्हणाले.

हेही वाचा :

“१४ वर्षीय मुलाकडून १० वर्षांच्या मुलीचा खून; थरकाप उडवणारी घटना”
“शारीरिक संबंधाची मागणी प्रकरणी काँग्रेस आमदारावर वादळ”
कर्ज काढलं, आईने वडिलांना दिलं लिव्हर… दोघेही दगावले