केरळ काँग्रेसचे आमदार(MLA) राहुल ममकूटाथिल यांच्यावर वादांचा सिलसिला थांबताना दिसत नाही. मल्याळम अभिनेत्री रिनी जॉर्ज यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता केरळमधील सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्ती अवंतिका विष्णू यांनीही त्यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे.

अवंतिकाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जून २०२२ मध्ये त्रिक्काकारा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझी राहुल ममकूटाथिल यांच्याशी भेट झाली. त्यानंतर त्यांनी फेसबुक मेसेंजर आणि टेलिग्रामवरून मला अश्लील मेसेज पाठवले. शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली आणि बंगळूरू किंवा हैदराबादमध्ये भेटण्याचा आग्रह धरला. त्या काळात ते मोठ्या पदावर होते, त्यामुळे मी गप्प राहिले.”
यापूर्वी अभिनेत्री रिनी जॉर्जने राहुल यांच्यावर अश्लील मेसेज पाठवून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर राहुल यांनी २२ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या केरळ युवा शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला.

राहुल ममकूटाथिल यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी रिनी जॉर्जबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “ती माझी चांगली मैत्रीण आहे. तिने केलेले आरोप खोटे आहेत आणि सिद्ध करून दाखवावेत.” मात्र अवंतिकाच्या आरोपांबाबत त्यांनी मौन पाळले आहे.या नवीन घडामोडीमुळे राहुल ममकूटाथिल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, काँग्रेस पक्षावरही याचा राजकीय दबाव वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे(MLA).
हेही वाचा :
54 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टूर बसचा भीषण अपघात
ढगफुटीने विनाश, घरांची मोडतोड, लोकंही गायब…..
पोलीस असल्याचे भासवत दिवसाढवळ्या अपहरण