हैदराबाद शहर हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी १० वर्षांच्या मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली दहावीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपी मुलगा मुलीच्या घराच्या शेजारी राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चोरीच्या उद्देशाने शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरी शिरला. त्याला खात्री होती की तिचे पालक कामावर गेले असतील. मात्र सोमवारी सुट्टी असल्याने मुलगी घरी एकटी होती. चोरी करताना मुलीने आरोपीला पाहिले आणि ओरडू लागली. घाबरलेल्या आरोपीने तिला थांबवण्यासाठी १८ वेळा चाकूने वार केले आणि नंतर गळा चिरून तिचा खून(Murder) केला.

पोलिस तपासात आरोपीच्या फोनमधून कुलूप तोडण्याचे, घरात न शिरता चोरी करण्याचे आणि तिजोरी फोडण्याचे व्हिडिओ शोधल्याचे समोर आले. त्याचबरोबर पोलिसांना आरोपीच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू, कपडे आणि एक हस्तलिखित नोट सापडली. या पत्रात त्याने चोरीसाठी धमकी लिहिली होती आणि शेवटी ‘मिशन डॉन’ असा उल्लेख होता.

हत्या (Murder)करून आरोपी शेजारच्या इमारतीत लपून बसला. काही रहिवाशांनी त्याच्या संशयास्पद हालचाली पाहिल्या होत्या. अखेर एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपासाची दिशा बदलली. सीसीटीव्ही फुटेज तपासून व शेजाऱ्यांकडून चौकशी करून पोलिसांनी आरोपीवर संशय घेतला.पोलिस जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा कुटुंबीयांनी तो शाळेत असल्याचे सांगितले. मात्र नंतर छापा टाकल्यानंतर हत्येत वापरलेले पुरावे पोलिसांच्या हाती लागले.

मुलीचे वडील दुपारी घरी आले असता त्यांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात सापडली. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. आई त्या वेळी कामावर गेली होती.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन गुन्ह्याची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा :

“शारीरिक संबंधाची मागणी प्रकरणी काँग्रेस आमदारावर वादळ”
कर्ज काढलं, आईने वडिलांना दिलं लिव्हर… दोघेही दगावले
गेमिंग ॲपच्या लाखो रुपयांच्या ऑफर नाकारून धनंजय पोवार यांचा आदर्श निर्णय – फॉलोअर्स भावूक