सोशल मीडियावर कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे धनंजय पोवार यांनी पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखो रुपयांच्या जाहिरातींच्या ऑफर मिळूनही त्यांनी एकदाही गेमिंग ॲपची(gaming app) जाहिरात स्वीकारली नाही. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये कौतुकाची लाट उसळली आहे.

धनंजय पोवार यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मिलियनहून अधिक फॉलोवर्स असलेल्या या तरुण इन्फ्लुएन्सरला मोठमोठ्या कंपन्यांकडून आकर्षक ऑफर मिळत असतात. गेमिंग ॲप्सच्या जाहिरातींसाठी त्यांना विशेष आमंत्रणे येत होती. मात्र, त्यांनी आपल्या चाहत्यांच्या हिताचा विचार करून त्या ऑफर स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

गेमिंग ॲप्समुळे'(gaming app) तरुणाईत व्यसन वाढत चालले असल्याचे समाजात अधोरेखित होत आहे. अशा वेळी या जाहिराती करून स्वतःचा फायदा करून घेण्याऐवजी त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करत “धनंजय पोवार DP साठी एक लाईक बनतोच” अशी घोषणा केली आहे.

त्यांच्या या भूमिकेमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हटले आहे. इतर इन्फ्लुएन्सर्ससाठी त्यांनी आदर्श घालून दिला असून, फॉलोअर्सच्या डोळ्यांत ते केवळ एक स्टार नाहीत तर जबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहिले आहेत.

हेही वाचा :

ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका

पोलीस असल्याचे भासवत दिवसाढवळ्या अपहरण

ढगफुटीने विनाश, घरांची मोडतोड, लोकंही गायब…..