मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. येत्या २९ ऑगस्टला मुंबईत भव्य आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याआधी आज दुपारी १२ वाजता आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील महत्त्वाची भूमिका जाहीर करणार आहेत(meeting).

काल झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला होता. ते म्हणाले, “ही आरक्षणासाठीची शेवटची लढाई आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आंतरवलीतून निघून आपण २९ तारखेला शांततेत मुंबईत आंदोलन करू. कुणी दगडफेक किंवा जाळपोळ करू नये. समाजाला डाग लागेल असे कृत्य टाळा. लेकरंबाळांसाठी लढा देतोय, ही आपली अखेरची फाईट आहे.”
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्यासाठी गावोगाव बैठका (meeting)आणि समाज बांधवांच्या गाठीभेटी सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत तब्बल २५ हजार गाड्या मुंबईकडे रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी समाजासाठी जे नेते पुढे येतील, त्यांनाच साथ देण्याचा निर्धार व्यक्त झाला.

दरम्यान, राज्य मराठा समन्वयक माऊली पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका करताना गंभीर आरोप केले आहेत. “सरकारने आंदोलनात अडथळा आणण्यासाठी हाके यांना फॉर्च्युनर गाडी आणि फ्लॅट दिला आहे. जरांगे पाटलांना कोट्यवधी मराठ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे १०-१५ लाखांच्या चर्चेला काहीही महत्त्व नाही. हाके यांना मराठा समाजावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे पवार म्हणाले.आता जरांगे पाटील आज दुपारी पत्रकार परिषदेत राज्य सरकारला अजून वेळ देणार का, की थेट आंदोलनाची आखणी जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शेअर बाजारात आज तेजीचा माहोल!
मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI ला ₹3580000000 चा फटका? टीम इंडियावरही परिणाम!
इचलकरंजीत मोठ्या उत्साहात अटल महोत्सव साजरा होणार