गेल्या काही काळात अचानक निवृत्तीचे, संघ सोडण्याच्या बातम्या क्रिकेट(cricket) विश्वातून येत आहेत. आता अशीच एक बातमी क्रिकेट विश्वातून येत आहे. भारतासाठी 16 टेस्ट सामने खेळलेला अनुभवी फलंदाज हनुमा विहारीने आंध्र क्रिकेट संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सिजनमध्ये तो त्रिपुरा संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. यासाठी त्याने आंध्र क्रिकेट असोसिएशनकडे एनओसीची मागणी केली आहे. हनुमा विहारी नुकताच आंध्र प्रीमियर लीगमध्ये खेळला होता आणि त्याने अमरावती रॉयल्सला अंतिम फेरीत पोहोचवले होते. मात्र, आता तो नवा प्रवास सुरू करण्याच्या तयारीत आहे.

क्रिकबजशी बोलताना विहारी म्हणाला की, “मी राज्य बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनकडून मला बऱ्याच दिवसांपासून संपर्क केला जात आहे. मी एनओसीसाठी आंध्र बोर्डाकडे अर्ज केला आहे.” त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनीदेखील याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, “या हंगामात आम्ही विहारीला व्यावसायिक खेळाडू म्हणून घेतले आहे. त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली जाईल. तो सर्व फॉरमॅटमध्ये (रेड बॉल व व्हाईट बॉल) खेळणार आहे.”
त्रिपुराचे माजी अध्यक्ष तपन लोढा यांनीही सांगितले की, “काही नावं आम्ही व्यावसायिक खेळाडू म्हणून सुचवली आहेत. अद्याप ती अधिकृत नाहीत, पण विहारीला संघात सामील करण्याचा निर्णय झाला आहे.”हनुमा विहारी हा भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमधील (cricket)अत्यंत अनुभवी फलंदाज आहे. त्याने एकूण 131 फर्स्ट क्लास सामने खेळले असून, त्यापैकी 44 सामने आंध्र संघासाठी खेळले आहेत. आंध्रकडून त्याने 3013 धावा (44.97 सरासरी) केल्या असून यात 4 शतकं आणि 20 अर्धशतकं आहेत.हैदराबादकडून खेळताना त्याने 40 सामन्यांत 3155 धावा (57.38 सरासरी) केल्या, ज्यात 10 शतकं आणि 12 अर्धशतकं आहेत.

आंध्र संघाचे नेतृत्वही त्याने केले होते, मात्र 2024 मध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला वादग्रस्तरीत्या कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने 16 टेस्ट सामन्यांत 839 धावा (33.56 सरासरी) केल्या आहेत.
हेही वाचा :
मीराबाई चानूचं जबरदस्त पुनरागमन! राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
आनंदाची बातमी! महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार १ लाख २२ हजार रुपये
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत