हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री(Actress) रुपाली भोसले आपल्या प्रेमाच्या कबुलीमुळे चर्चेत आली आहे. ‘बडी दूर से आये है’ या हिंदी मालिकेनंतर ‘आई, कुठे काय करते?’ या मालिकेतून रुपाली भोसले प्रकाशझोतात आली. रुपालीचं रिल आणि रिअल लाईफ कायमच चर्चेत राहीलं. घटस्फोट अन् ब्रेकअप या दुःखात असलेली रुपाली पुन्हा प्रेमात पडल्याचं तिने कबुल केलं आहे. चाहत्यांना देखील रुपाली वैयक्तिक आयुष्यात काय करते? हे जाणून घेण्यास उत्सुक असतात.

‘राजश्री मराठी’ सोबत झालेल्या मुलाखतीत रुपाली भोसलेने आपण डेट करत असल्याची कबुली दिली आहे. रुपाली म्हणते की,’हो, मी रिलेशनशिपमध्ये आहे. मुलाखतीत रुपालीला तिच्या लग्नाबद्दल विचारले असता तिने मजेशीरपणे “माझे लग्न झाले आहे, मी स्वतःशीच लग्न केले आहे” असे उत्तर दिले. रुपालीला तिच्या आयुष्यात पुढे जायचे आहे आणि लग्न करण्याची इच्छा आहे. मात्र, तिचा भाऊ संकेतच्या आयुष्यात स्थैर्य येईपर्यंत आणि त्याचे लग्न होईपर्यंत ती स्वतःच्या लग्नाचा विचार करू शकत नाही. तिने तिच्या भावाच्या प्रगतीला आणि स्थैर्याला प्राधान्य दिले आहे

पुढे रुपाली सांगते की, जसं मी त्याला आणि आई-बाबांना सांभाळत आहे. तशीच माझ्याव्यतिरीक्त कोणीतकी इतर मुलगी त्याला सांभाळण्यासाठी आली. तेव्हा मी माझा विचार करायला मोकळी होऊन. एवढंच नव्हे तर माझ्या डोक्यात सतत त्याचे विचार येत राहतील. म्हणून मी लग्न करत नाही कारण तेव्हा मी ही आनंदी नसेल आणि ती व्यक्तीही. त्यामुळे मी माझ्याबद्दलचा विचार हे सगळं छान सुरळीत झाल्यावरच करणार आहे.

रुपाली भोसले या अभिनेत्रीचा(Actress) पहिला घटस्फोट झाला आहे. मिलिंद शिंदे हा तिचा पहिला पती होता. या नात्यात तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. त्यानंतर ती परदेशातून आपली सुटका करुन परत भारतात परतली. लग्नाच्या वाईट अनुभवाबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाले होती की, लग्नासाठी तिने करिअर देखील सोडलं होतं. पण त्यानंतर ती परत आली आणि नव्याने करिअरला सुरुवात केली. यानंतर रुपाली भोसले अंकित मगरेला डेट करत होती. इव्हेंट मॅनेजर असलेल्या अंकितला रुपाली 2020 पासून 3 वर्ष डेट करत होती. पण नंतर ते दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

हेही वाचा :

५६ वर्षांची आजी आणि ३३ वर्षांचा बॉयफ्रेंड…
भारतीय टीमच्या जर्सीवर पुढचा स्पॉन्सर कोण?
धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा VIDEO व्हायरल