बॉलिवूडचे(Bollywood) सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या विरोधात राजस्थानमधील भरतपूर येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार हुंडई अल्काझार SUV कारमधील कथित उत्पादन दोषांशी संबंधित आहे.भरतपूरचे रहिवासी कीर्ती सिंह यांनी 2022 मध्ये तब्बल 23 लाख रुपयांना हुंडई अल्काझार SUV खरेदी केली होती. मात्र काही महिन्यांतच गाडीमध्ये तांत्रिक समस्या दिसू लागल्या. या समस्यांबाबत त्यांनी कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या पण त्यावर कंपनीने काहीही तोडगा काढला नाही.

यामुळे त्रस्त होऊन कीर्ती सिंह यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर 25 ऑगस्ट रोजी भरतपूरच्या मथुरा गेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल झाली.या प्रकरणात हुंडई मोटर इंडियाचे शीर्ष अधिकारी मॅनेजिंग डायरेक्टर एन्सो किम, सीओओ तरुण गर्ग, मालवा ऑटो सेल्स प्रा. लि.चे एमडी नितीन शर्मा, संचालक प्रियंका शर्मा यांच्या नावांसह शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांना देखील आरोपी करण्यात आलं आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे हुंडई ऑटोमोबाईलचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. तक्रारदार कीर्ती सिंह यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, हुंडईच्या प्रचार मोहिमेतून या दोन्ही कलाकारांनी ग्राहकांना गाडीवर विश्वास ठेवायला प्रवृत्त केलं. पण उत्पादन दोष लपवून खोटं चित्र रंगवलं गेलं. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल झाली.सध्या शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या टीमकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि ही एफआयआर नोंदवली गेल्याने प्रकरणाने मोठं वळण घेतलं आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्याविरुद्ध राजस्थानमधील भरतपूर येथील मथुरा गेट पोलीस ठाण्यात 25 ऑगस्ट 2025 रोजी FIR दाखल झाली आहे. ही तक्रार हुंडई अल्काझार SUV मधील कथित उत्पादन दोषांशी संबंधित आहे, ज्यामुळे तक्रारदाराच्या कुटुंबाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला.

भरतपूरचे रहिवासी आणि वकील कीर्ती सिंह यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी जून 2022 मध्ये हरियाणातील सोनीपत येथील मालवा ऑटो सेल्स प्रा. लि. कडून 23.97 लाख रुपयांना हुंडई अल्काझार SUV खरेदी केली होती. काही महिन्यांतच गाडीला तांत्रिक समस्या, जसे की अॅक्सिलरेटर दाबल्यावर गाडी कंप पावणे आणि गती न वाढणे, दिसू लागल्या.
कीर्ती सिंह यांनी हुंडई मोटर इंडिया आणि डीलरशिपने उत्पादन दोष लपवून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर ब्रँड अॅम्बेसेडर्स म्हणून दोषपूर्ण उत्पादनाचा प्रचार करून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे(Bollywood).
हेही वाचा :
केक कापताच इमारत कोसळली, माय-लेकीचा मृत्यू
4 वर्षांतच पत्नीपासून विभक्त? प्रसिद्ध जोडप्याच्या घटस्फोटाची चर्चा
मनोज जरांगे पाटलांचं नेमकं “साध्य” काय आहे?