‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेता नील भट्ट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत घटस्फोटाच्या(divorce)चर्चा जोर धरू लागल्या आहेत. नुकत्याच गणेश चतुर्थीनिमित्त ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंनंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

ऐश्वर्याच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असून, तिने इन्स्टाग्रामवर गणेशोत्सवाचे काही सुंदर फोटो शेअर केले. मात्र या फोटोंमध्ये नील कुठेही दिसला नाही. त्यामुळे चाहत्यांनी तिला थेट विचारलं – “नीलसोबत तू फोटो का काढला नाहीस? तो कुठे आहे?” तर दुसऱ्या एका युजरने विचारलं, “खरंच तुमचा घटस्फोट (divorce)झाला का?”

याआधीही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तेव्हा ऐश्वर्याने स्पष्ट प्रतिक्रिया देत, “खोट्या बातम्या पसरवणं थांबवा,” असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी तिने आणखी एक पोस्ट शेअर करत म्हटलं होतं, “मी बराच काळ गप्प राहिले. कारण मला माझी शांती जपायची होती. पण मी न बोललेल्या गोष्टीही काही जणांकडून लिहिल्या जात आहेत. माझ्या नावाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, हे पाहून मला त्रास होतो.”

नील आणि ऐश्वर्याची पहिली भेट ‘गुम है किसी के प्यार में’च्या सेटवर झाली होती. एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांनी ‘बिग बॉस १७’मध्येही एकत्र भाग घेतला होता. या शोदरम्यान त्यांच्यात अनेकदा वाद झालेले दिसले होते.सध्या ऐश्वर्याच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, नील आणि ऐश्वर्या यांच्याकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया येणं बाकी आहे.
हेही वाचा :
मनोज जरांगे पाटलांचं नेमकं “साध्य” काय आहे?
28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मोठं संकट, सात राज्यात अलर्ट,
त्या व्हायरल व्हिडीओवर भडकली आलिया; म्हणाली ‘अत्यंत खासगी..’