कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
दोन वर्षांपूर्वी मुंबईवर धडकणार म्हणून अंतरवालीतून मोठ्या निर्धाराने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरच वाशी येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी”तह”करून मागणी मान्य झाल्याचे गृहीत धरले आणि गुलाल उधळला होता(politics). आज मात्र पुन्हा मुंबईवर धडकण्याची भाषा करणारे मनोज जरंगे पाटील म्हणतात दोन वर्षांपूर्वी लढ्याचा तो स्वल्पविराम होता, आणि आता मागणी मान्य झाल्याचे मी संदिग्धपणे शासनाने सांगितले तरच मराठ्यांच्या आरक्षण लढ्याला पूर्णविराम मिळेल असा इशारा देताना त्यांनी मुंबईत जाऊन उपोषण करण्यासाठी निवडलेला दिवस मात्र गणेशोत्सवाच्या धामधुमीचा निवडला आहे.

त्यामुळे त्यांना नेमके साध्य काय करायचे आहे हे समजायला मार्ग नाही. गणेशोत्सव हा तमाम हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे, उत्सव आहे आणि आता तर राज्य शासनानेगणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आणि तेथील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. मुंबई शहर हे कायमपणे दहशतवाद्यांच्या हीट लिस्ट वर आहे. त्यामुळे मुंबई पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतो. या काळात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द केलेल्या असतात.
या एकूण पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन पुढे ढकलावे असे शासनाला वाटते आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी भेट घेऊन जरांगे पाटील यांना तसे आवाहनही केलेले आहे. तुमच्या आंदोलनाला शासनाचा विरोध नाही, पण सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धामधुमीत ते नको, कारण काही समाजकंटक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचे विघ्न नको असे शासनाला वाटते अशी स्पष्ट भूमिका स्वीय सहायकांनी त्यांच्यासमोर मांडली असली तरी त्यांनी ती मान्य केलेली नाही.

राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून वेळ मागितला म्हणून मी तीन महिन्यापूर्वी माझे आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर शासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. त्यामुळे मला आता पुन्हा एकदा आंदोलन करावेच लागेल आणि ते मी करणार असून ते अतिशय शांततापूर्ण वातावरणात असेल अशी ग्वाही जरांगे पाटलांनी दिली आहे(politics).
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला दोन वर्षांपूर्वी मंत्रीपदी असलेल्या छगन भुजबळ यांनी विरोध केला होता. ओबीसी समाजाची उघडपणे बाजू घेतली होती. त्यासाठी त्यांनी मंत्रिपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंगही करण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. आता ते विरोध करण्यासाठी पुढे आलेले नसले तरी लक्ष्मण हाके यांनी त्यांची जागा घेतलेली आहे. दोनच दिवसापूर्वी त्यांनी मराठा आरक्षणाचे समर्थक आमदार विजयराव पंडित यांच्याशी वाद नव्हे तर राडाकेला आहे.
त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तयार झाला आहे. मुंबईच्या वेशीवर आगरी आणि कोळी बांधवांनी मोठ्या संख्येने येऊन मनोज जरांगे पाटलांना आडवावे असे आवाहन केले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे उपोषण आंदोलन होणार आहे, पण उपोषणासाठी. आझाद मैदानाचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. गणेशोत्सव हा सर्व हिंदू बांधवांचा असतो आणि आहे.तो नेहमीच उत्साही वातावरणात साजरा केला जातो.
अशा सणासुदीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आणि आसपासचा परिसर तणावग्रस्त बनवू नये असे प्रत्येक हिंदूला वाटते. गणेशोत्सवाच्या धामधुमीतमराठा समाजाचा आवाज घुमवून मनोज जरांगे पाटील यांना नेमके साध्य काय करावयाचे आहे हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रात हिंदू समाजाचा मोठा भाग असलेल्या मराठा समाजालाही गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने साजरा करावयाचा आहे.मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाचा लढा एका उंचावरून नेऊन ठेवतात आणि अचानक चर्चेच्या टेबलवर येऊन आंदोलनाला स्वल्पविराम देतात. हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
हेही वाचा :
त्या व्हायरल व्हिडीओवर भडकली आलिया; म्हणाली ‘अत्यंत खासगी..’
कोणी एवढं गोड कसं असू शकतं?
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस;….