अभिनेत्री (Actress)आलिया भट्टने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. कारण रणबीर कपूर आणि आलियाच्या पाली हिल परिसरातील आलिशान नव्या बंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोरील इमारतीतून शूट करण्यात आला होता आणि परवानगीशिवाय ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता.

आलिया-रणबीरने ‘कृष्ण राज’ या राज कपूर यांच्या मालकीच्या प्रॉपर्टीवर तब्बल 250 कोटी रुपये खर्च करून सहा मजली बंगला बांधला आहे. गेली तीन वर्षे या घराचं बांधकाम सुरू होतं. नुकताच आलिया, रणबीर आणि मुलगी राहा या घरात राहायला गेले. त्यानंतर पापाराझींनी या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने वाद निर्माण झाला.

या प्रकरणावर आलियाने इन्स्टाग्रामवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली,”मुंबईसारख्या शहरात जागा मर्यादित असते, पण त्यामुळे कोणाच्याही खासगी निवासस्थानाचे फोटो किंवा व्हिडीओ परवानगीशिवाय काढण्याचा अधिकार कोणालाच मिळत नाही. आमच्या खासगी जागेचा व्हिडीओ कंटेंट नाही, तर हा उल्लंघन आहे. याला कधीही समर्थन दिलं जाऊ नये.”

तिने पुढे लिहिलं, “एकदा विचार करा, तुमच्या घराचे व्हिडीओ तुमच्या माहितीशिवाय सार्वजनिक केले तर तुम्हाला कसं वाटेल? त्यामुळे मी नम्रपणे विनंती करते की, असा कोणताही कंटेंट कुणीही फॉरवर्ड किंवा शेअर करू नये. त्याचप्रमाणे मीडियातील आमच्या मित्रांना देखील हे फोटो-व्हिडीओ लगेच काढून टाकण्याची विनंती करते.”

आलियाच्या या पोस्टवर तिच्या आई आणि अभिनेत्री (Actress)सोनी राजदान यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं,”धक्कादायक म्हणजे काही पब्लिकेशन्स अशा गोष्टी करण्याचा विचार करतात. लोक जबाबदारीने वागतील आणि हे व्हिडीओ लगेच काढून टाकतील अशी मला खात्री आहे.”

हेही वाचा :

माता न तू वैरिणी! पोटच्या एक महिन्याच्या लेकीचा खून 
३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! धबधब्याच्या काठावर गेला अन्…, VIDEO VIRAL
सावधान! ‘या’ लोकांसाठी नारळ पाणी म्हणजे विषच, एकदा प्यायले तर..