रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत, मुलगा हवा होता पण मुलगी झाल्याने एक महिन्याच्या बालिकेची हत्या(Murder) करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.शिल्पा प्रविण खापले ही वहाळ (घडशीवाडी) येथे पती, दोन मुली आणि सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. तिला दुसऱ्यांदा मुलगा व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने ती नाराज होती. ५ मार्च २०२१ रोजी घरात कोणी नसल्याची संधी साधून शिल्पाने आपल्या एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारले.

घटनेनंतर शेजाऱ्यांना दिशाभूल करण्यासाठी तिने मुलगी बेशुद्ध पडल्याचे सांगितले. सुरुवातीला सावर्डे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भा.द.वि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांच्या सखोल तपासानंतर शिल्पा खापले हिच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अनुपमा ठाकूर यांनी १५ साक्षीदारांची साक्ष मांडली(Murder).

वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच शेजाऱ्यांच्या साक्षींवर आधारित पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिल्पा खापले हिला दोषी ठरवले.न्यायालयाने आरोपीस आजीवन कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा :

३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! धबधब्याच्या काठावर गेला अन्…, VIDEO VIRAL
सावधान! ‘या’ लोकांसाठी नारळ पाणी म्हणजे विषच, एकदा प्यायले तर..
शेट्टी अण्णा भडकले; आर्टिस्टला सगळ्यांसमोर झापले, पाहा VIDEO