विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये एका कुटुंबावर काळाने अशी झडप घातली की, आनंदाचा दिवस काही क्षणांत दुःखद बनला.विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओंकार जोईल यांच्या लेकी उत्कर्षाचा त्या दिवशी पहिला वाढदिवस(Birthday) होता. घरात उत्साहाचं वातावरण होतं.

नातेवाईकांना फोटो, व्हिडिओ पाठवून वाढदिवसाचा आनंद जोईल कुटुंब शेअर करत होतं. घर सजवलं होतं, केक कापण्यात आला होता. पण केक कापून अवघी पाच मिनिटं झाली असतानाच इमारतीचा एक भाग कोसळून शेजारील चाळीवर कोसळला.या घटनेत लहानगी उत्कर्षा आणि तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील ओंकार जोईल अद्याप बेपत्ता आहेत. स्थानिक रहिवाशांनी जीव धोक्यात घालून सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं असून, त्यांच्यावर विरार आणि नालासोपारा येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वाढदिवसाच्या(Birthday) आनंदाला मृत्यूची किनार लागल्याने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विरार पोलिसांनी या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

4 वर्षांतच पत्नीपासून विभक्त? प्रसिद्ध जोडप्याच्या घटस्फोटाची चर्चा
मनोज जरांगे पाटलांचं नेमकं “साध्य” काय आहे?
28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मोठं संकट, सात राज्यात अलर्ट,