अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीशी संबंधित एक महत्वाची बातमी हाती आली आहे. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे.

अरुण गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन मिळण्यासाठी गवळीकडून सातत्याने अर्ज केला जात होता. विविध कारणे देत जामीनासाठी अर्ज केला जात होता. परंतु, अर्ज काही मंजूर होत नव्हता. अखेर न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली.

मुंबईतील घाटकोपर परिसरात शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची 2 मार्च 2007 रोजी हत्या करण्यात आली होती. सुमारे 18 वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. जामसंडेकर यांची राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जामसंडेकर त्यांचे रोजचे काम आटोपून घरी आले होते. टीव्ही पाहत होते. त्याचवेळी गुंड अचानक घरात शिरले आणि त्यांनी कमलाकर जामसंडेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला होता.

अरुण गवळी दुसऱ्या एका प्रकरणात नागपूर कारागृहात बंद होता. या प्रकरणातही न्यायालयाने काही अटीशर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला होता. परंतु, जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात मात्र त्यांना जामीन मिळत नव्हता. परंतु, याही प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता अरुण गवळी तब्बल 18 वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे.

जामसंडेकर हत्या प्रकरण नेमकं काय?
दरम्यान, अठरा वर्षांपूर्वी कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणाची मोठी चर्चा राज्यात झाली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला होता. या प्रकरणात अरुण गवळीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ज्यावेळी ही हत्या झाली तेव्हा अरुण गवळी आमदार होता. एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाण्याची बहुधा ही पहिलीच वेळ होती.

हेही वाचा :

महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल