अनेक वर्षे रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशिया असेल किंवा युक्रेन यांपैकी कोणताही देश माघार घेण्यासाठी तयार नाहीये. दरम्यान आता रशियाने युक्रेनवरील आपले हल्ले(attack) अधिक तीव्र केले आहेत. जगभरातील अनेक देशांचे प्रमुख हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र रशियाने आज पुन्हा एकदा युक्रेनवर भीषण हल्ले केले आहेत.

रशियाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये असणाऱ्या युरोपियन युनियनचे शिष्टमंडळाच्या इमारतीवरच थेट हल्ला केला आहे. हा हल्ला भीषण स्वरूपाचा होता. या हल्ल्यात(attack) रशियाने 629 मिसाईल्स आणि ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे. रशियाने कीवमध्ये भयानक हल्ले केल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.
रशियाने केलेल्या या भीषण हल्ल्यात जवळपास 14 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या हल्ल्यात युरोपीय संघ मिशनच्या इमारतीला नुकसान झाल्याचे युक्रेनचे विदेश मंत्री आंद्रेई सिबीहा यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून सांगितले.
इतके वर्ष सुरू असलेल्या युद्धात रशियाने आतापर्यंत केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. यामध्ये 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन मुलांचा देखील समावेश आहे. या हल्ल्याचा(attack) जगभरातून निषेध व्यक्त होणे गरजेचे आहे.
Following the barbaric Russian strike on the Ukrainian capital, it was important to visit, together with heads of 55 foreign diplomatic missions, the site of one of the strikes, a ruined residential building in the Darnytskyi district. This is a site of a horrible war crime. At… pic.twitter.com/UEAx6atz7g— Andrii Sybiha 🇺🇦 (@andrii_sybiha) August 28, 2025युक्रेनवर एकाच रात्रीत 629 मिसाईल्स आणि ड्रोन्सने हल्ले करण्यात आले. रशियाने शांततेचा भंग केला आहे. दहशत आणि नुकसान. या हल्ल्यात लहान मुलांसह 14 पेक्षा जास्त नागरिक ठार झाले आहेत. फ्रांस या हल्ल्याचा निषेध करतो, अशी पोस्ट फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष यांनी केळी आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी त्याचा शेवट अजूनही दूरच दिसतो आहे. मात्र, नुकतीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जगभरातील नजरा पुन्हा एकदा या संघर्षाच्या संभाव्य समाप्तीकडे वळल्या आहेत.
कारण रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा, अन्नधान्य बाजारपेठ आणि भू-राजकीय समीकरणे हादरली आहेत. अशा वेळी, रशिया आणि अमेरिकेच्या उच्चस्तरीय चर्चेचा सूर बदलल्यास, शांततेची नवीन शक्यता निर्माण होऊ शकते. युक्रेनमधील संघर्षाला अधिक गुंतागुंतीचे स्वरूप देणारा एक मुद्दा म्हणजे नाटोची भूमिका. युरोपियन सैन्याची युक्रेनमध्ये संभाव्य तैनाती आणि नाटोचा वाढता विस्तार याविषयी पेस्कोव्ह यांनी कडवट भूमिका मांडली आहे.
हेही वाचा :
महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल