मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण(reservation) मिळावे या प्रमुख मंगणीसह मनोज जरांगे पाटील लाखो आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने कडकडून विरोध केला आहे. तसेच त्यासाठी आंदोलन करण्याची देखील तयारी दर्शवली आहे.

मराठा आरक्षणासाठी(reservation) मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. त्याच संदर्भात काल नागपूरमध्ये ओबीसी महासंघाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये नेमके काय घडले आहे ते जाणून घेऊयात.

काल नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायडे यांच्या नेतृत्वच ओबीसी महासंघाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आल्याचे समजते आहे.

उद्यापासून राज्यभरात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाची भूमिका मांडली जाणार आहे. 30 तारखेला नागपूरमध्ये साखळी उपोषण केले जाणार आहे. तसेच ओबीसी समाज देखील येत्या 15 दिवसांमध्ये मुंबईकडे कूच करण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका ओबीसी महासंघाने घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या विषयावरुन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत अनेक बदल केले आहेत. पुढील सूचना येईपर्यंत हे वाहनचालकांना हे बदल पाळावे लागणार आहेत.

काय आहेत अटी शर्ती?

  1. आंदोलन करण्यासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे.
  2. आंदोलकांची संख्या 5 हजार असणे आवश्यक आहे.
  3. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा वापरता येणार नाही.

हेही वाचा :

महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल